Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra farmer get subsidy upto 6 lakh 90 thousand rs . anudan scheme ] : शेतकरी वर्गांसाठी सरकार मार्फत विविध योजना राबविण्यात येतात , यांमध्ये काही योजना केंद्र सरकारच्या अनुदानातुन राबविण्यात येत असतात . अशीच एक योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येते , ज्यांमध्ये शेतकऱ्यांना 6 लाख 90 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाते .

शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी निगडील अनुदान योजना राबविण्यात येते , यांमध्ये शेतकऱ्यांना शेतीबरोबरच उत्पन्नाचे इतर स्त्रोत उपलब्ध करुन दिले जाते . यांमध्ये कृषी क्षेत्राशी निगडीत असणारे पीक लागवड करीता अनुदान दिले जाते असते . यांमध्ये शाश्वत पद्धतीने उत्पादन मिळण्यास सहाय्यभुत ठरते ..

शेतीमध्ये नाविण्यपुर्ण प्रकल्प / उपक्रम करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड करण्यासाठी प्रेरित करणे व शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावणे हा मुख्य उद्देश आहे . म्हणजेच बांबू लागवडीकरीता सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाते .

अटल बांबू समृद्धी योजना : सदर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना बांबू लागवडी करीता 6,90,000/- रुपये इतके अनुदान दिले जाते . सदर अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांस 03 वर्षांमध्ये मिळत असते . सदरचे अनुदान हे रोप तसेच मजुर तसेच देखभाल करण्यासाठी अनुदान दिले जाते . पावसाळा ऋतु हा बांबु लागवडीचा ऋतु असल्याने शेतकऱ्यांना या योजना अंतर्गत लाभ घेण्यास अधिक फायदेशिर ठरु शकेल .

हे पण वाचा : 12 वी पात्रताधारकांसाठी गट ब व गट क संवर्गातील 2,006 जागेसाठी महाभरती !

लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : सदर योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे 7/12 , आठ उतारा , आधार कार्ड , पॅन कार्ड , बँक पासबुक , पासपोर्ट फोटो इ.

अर्ज कसा कराल ? :  सदर योजना अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आपल्या तालुका / जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा आपल्या जवळच्या कृषी सहाय्यक / अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा .

खास शेतकऱ्यांसाठी नियमित हवामान अंदाज, कृषी बाजारभाव, कृषि योजना बाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी खालील WhatsApp ग्रूप मध्ये सामील व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *