Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra employee types of leave rules detail ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळामध्ये रजेची आवश्यकता असते , कर्मचाऱ्यांच्या प्रयोजनुसार विविध रजेचे प्रकार महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे .
विशेष किरकोळ रजा : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष किरकोळ रजा कुटुंब नियोजनाकरिता दिली जाते , यामध्ये पुरुषांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करिता सहा दिवसांची विशेष किरकोळ रजा केली जाते . तर सदरची शस्त्रक्रिया अपयशी ठरल्यास दुसऱ्या वेळेस देखील 06 दिवसांची विशेष किरकोळ रजा दिली जाते . तर पत्नीच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या दरम्यान पतीस 07 दिवसांची विशेष किरकोळ जा दिली जाते . जर कायदेशीर रित्या गर्भपात नंतर शस्त्रक्रिया केल्यास सदर महिला कर्मचाऱ्यास 14 दिवसांची विशेष किरकोळजा दिली जाते .
विशेष नैमित्तिक रजा ( Special Casual Leave ] : कर्मचाऱ्यांना विशेष प्रयोजन करिता दिल्या जाणाऱ्या रजास विशेष नैमित्तिक रजा दिली जाते . सदर रजेची नोंद कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकामध्ये करणे आवश्यक असते . सदर रजेकरिता आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक असते . प्रयोजन व दिली जाणारी रजा पुढील प्रमाणे पाहूयात ..
कुत्रा अथवा तत्सम जनावर चावल्यास : कुत्रा अथवा तस्यम जनावर चावल्यास कर्मचाऱ्यास उपचाराकरिता 21 दिवसांची विशेष नियमितिक रजा दिली जाते , याकरिता वैद्यकीय दाखला जोडणे आवश्यक असते .
बाळंतपणानंतर लगेच शस्त्रक्रिया केल्यास दिले जाणारे रजा : कर्मचाऱ्यांच्या पत्नीने बाळंतपणानंतर लगेच संतती नियमानाची शस्त्रक्रिया केल्यास , पुरुष कर्मचाऱ्यास चार दिवसांची विशेष किरकोळ दिली जाते , तर अन्यवेळी शस्त्रक्रिया केल्यास सात दिवसांची विशेष नैमित्तिक रजा दिली जाते .
रक्तदान केल्यास दिली जाणारी रजा : कर्मचाऱ्यांनी स्व – इच्छेने विनामूल्य रक्तदान केल्यास , सदर कर्मचाऱ्यास एक दिवसांची विशेष नैमित्तिक रजा दिली जाते . याकरिता वैद्यकीय दाखला आवश्यक असेल .
क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्याकरिता रजा : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता एका वर्षात 30 दिवस इतके विशेष नैमित्तिक रजा मिळू शकते , याकरिता क्रीडा अधिकाऱ्याचा दाखला जोडणे आवश्यक असेल.
किरकोळ रजा : कर्मचाऱ्यास एका कॅलेंडर वर्षामध्ये 08 दिवस इतके किरकोळ रजा घेता येते . ही रजा रजेचा प्रकार नसून कर्मचाऱ्यास तात्पुरती दिली जाणारी सूट आहे , सदर रजेवर कर्मचाऱ्यांचा अधिकार नसून , कार्यालय प्रमुखांच्या परवानगीनेच सदर रजा घेता येते . सदरची रजा सार्वजनिक सुट्टीस लागून मधोमध घेता येते .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.