Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra zp teacher transfer new sudharit gr ] : राज्यातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून दिनांक 18 जुन 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून , त्या अनुषंगाने दिनांक 07 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार , अधिक्रमित करुन आता जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी सदरच्या शासन निर्णयानुसार पुढीलप्रमाणे सुधारित धोरण हे निश्चित करण्यात येत आहेत .

अवघड क्षेत्र / सर्वसाधारण क्षेत्र : यांमध्ये शासन निर्णय 07 एप्रिल 2021 मध्ये नमुद 7 बाबींपैकी किमान 3 बाबींची / निकषांची पुर्तता होईल असे गाव / शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल , तर यांमध्ये अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण  क्षेत्रात मोडतील ..

बदलीचे वर्ष / निश्चित धरावयाची सेवा : यांमध्ये ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्षे , तर अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत पुर्ण झालेली एकुण सलग सेवा नमुद करण्यात आलेली आहे .

शिक्षक / सक्षम प्राधिकारी : सदर शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्यापक असतील , तर शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील असे नमुद करण्यात आलेले आहेत .

बदली करीता अधिकार प्राप्त शिक्षक : बदली अधिकारी प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रांमध्ये बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा 03 वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक झाली असेल असे शिक्षक . तर पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक व बदली प्रक्रिया सुरु असताना निलंबित / सेवेतुन कार्यमुक्त केलेले शिक्षक हे बदली प्रक्रीयेमधून वगळण्यात येणार शिक्षक असणार आहेत .

विशेष संवर्ग शिक्षक भाग -1 मध्ये पक्षाघाताने आजारी शिक्षक , दिव्यांग शिक्षक , निर्णयांमध्ये नमुद विविध आजारांने त्रयस्त शिक्षक , विधवा शिक्षक , कुमारिका शिक्षक , परित्यक्ता / घटस्फोटित झालेले शिक्षक , वयाची 53 वर्षे पुर्ण झालेले शिक्षक , स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा मुलगी / नातु नात ( स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंतच ) यांचा समावेश करण्यात आलेला आहे .

बदलीकरीता पात्र शिक्षक : यांमध्ये बदलीसाठी पात्र शिक्षक म्हणजेच ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रांमध्ये अथवा अवघड क्षेत्रांमध्ये बदलीकरीता निश्चित धरावयाची सलग सेवा 10 वर्षे पुर्ण झालेली आहे ,आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकांची सेवा 5 वर्षे पुर्ण झालेली आहे असे शिक्षक ,तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिकत असलेली पदे भरावयाची झाल्यास , सर्वसाधारण क्षेत्रांमध्ये 10 वर्षे पुर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील 05 वर्षे सेवेची अट लागु राहणार नाही .

तसेच अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाज्येष्ठता चिारात घेवूनच सर्वसाधारण क्षेत्रांमध्ये 10 वर्षे पुर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य ज्येष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रांमध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल असे नमुद करण्यात आलेले आहेत .

या संदर्भात ग्रामविकास विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीप्रमाणे पाहु शकता .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *