लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील ज्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग थकबाकीच्या पहिला , दुसरा , तिसरा तसेच चौथा हप्ता मिळलेला नाही . अशा कर्मचाऱ्यांना उर्वरित हप्त्याची रक्कम अदा करणेबाबत मा.शिक्षण संचालक प्रति दि.29.05.2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण प्रसिद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
महाराष्ट्र राज्याचे नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाडे यांच्याकडून राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग थकबाकीच्या पहिला , दुसरा , तिसरा तसेच चौथा हप्ता मिळणेबाबत , मा.शिक्षण संचालक ( प्राथमिक ) यांना पत्र सादर केले आहेत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने दि.28.05.2023 रोजी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण संचालक यांना पत्र सादर केले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , वित्त विभागाच्या दि.24.05.2023 च्या शासन निर्णयानुसार चौथा हप्ता देण्याचे निर्देशित करण्यात आलेले होते . मात्र राज्यातील शिक्षकांना काही जिल्ह्यात सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळाला तर काही जिल्ह्यात पहिला हप्ता सुद्धा मिळाला नाही , ही बाब अतिशय गंभीर आहे. वित्त विभागाचा शासन निर्णय असताना सुद्धा जिल्हा स्तरावर याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही .
हे पण वाचा : राज्य कर्मचारी जाणार , पुन्हा एकदा राज्यव्यापी संपावर !
विशेष म्हणजे शिक्षकांना वगळून सर्व राज्य कर्मचाऱ्यांना थकबाकीचे सर्व हप्ते देण्यात आले आहेत , यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र रोष निर्माण झालेला आहे .थकबाकीचे सर्व हप्ते जूनच्या वेतनासोबत मिळाले नाही तर जुलै 2023 मध्ये तीव्र आंदोलनाची भूमिका महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघटनेने घेतली आहे . तरी सातव्या वेतन आयोगाच्या पहीला , दुसरा , तिसरा तसेच चौथा हप्ता त्वरील अदा करणेबाबत कार्यवाही करण्याच्या विनंती करण्यात आलेली आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय , शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !