Live Marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra District Wise Rain Chance Update ] : राज्यात जिल्हानुसार कोणत्या तारखेला अवकाळी पाऊस पडेल याबाबत , हवामान खात्याकडून अंदाज दर्शविण्यात आलेला आहे . सदर कालावधीमधील पाऊस हा अवकाळी व पिकांचे नुकसान करणारा असतो , यामुळे या काळातील पाऊसापेक्षा नुकसान अधिक प्रमाणात होते . हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला पाऊस पडेल याबाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे घेवूयात ..
राज्यात विदर्भ , मराठवाड्यातील काही जिल्हे सोडले तर इतर जिल्ह्यांमध्ये दिनांक 16 मार्च ते 20 मार्च या कालावधीमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपीट झालेली आहे . यामुळे मराठवाडा व विदर्भातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत , यामुळे सदर भागांमध्ये लवकरात लवकर पंचनामे करुन , नुकसान भरपाईची रक्कम मिळावी याकरीता मागणी करण्यात येत आहेत .
पुन्हा अवकाळी पाऊस येणार : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञ श्री.माणिकराव खुळे यांनी महत्वपुर्ण माहिती दिलेली आहे . सदर हवामान शास्त्रज्ञांने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 28 मार्च ते दिनांक 31 मार्च या कालावधीमध्ये राज्यात ढगाळ हवामानाची दाट शक्यता आहे , मात्र पाऊस तुरळक ठिकाणीच अवकाळी पाऊस पेडल , तसेच दिनांक 12 एप्रिल ते दिनांक 18 एप्रिल या कालावधीत नाशिक , अहमदनगर , खान्देश , पुणे ,सातारा , कोल्हापुर , सोलापुर , सांगली त्याचबरोबर विदर्भ व मराठवाडा ढगाळ वातावरणांसह किरकोळ पावसाची शक्यता आहे ..
मात्र विदर्भ मध्ये बुलढाणा , वाशिम , अमरावती , नागपुर , वर्धा , अकोला या भागांमध्ये गारपिटांसह किरकोळ पावसाची शक्यता वर्तविली आहे .मराठवाड्या सारख्या ठिकाणी पाण्याची मोठी टंचाई भासत असल्याने , अवकाळी पावसाची देखिल शेतकरी वाट पाहत आहेत . कारण मराठवाड्यातील लातुर , धाराशिव जिल्ह्यांमध्ये काही पिण्याच्या पाण्याची देखिल टंचाई भासत आहे .