Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra budget to 10 Ghoshana ] : काल दिनांक 28 जुन 2024 रोजी विधानसभेत पावसाळी अर्थसंकल्प राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केले , या अर्थसंकल्पांमध्ये , राज्यातील महिलांना दरमहा 1500/- , तीन सिलेंडर मोफत सह करण्यात आलेल्या टॉप 10 घोषणांची माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मध्य प्रदेश राज्य सरकारच्या धर्तीवर राज्यातील वय वर्षे 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा 1500/- रुपये देण्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे , याकरीता महिलांना आर्थिकदृष्ट्या मदत होण्यास सहाय्यभूत ठरणार आहे .

मुलींना परीक्षा शुल्क तसेच शिक्षण शुल्क माफ : राज्यातील मुलींना व्यावसायिक शिक्षणासाठी यांमध्ये अभियांत्रिकी  , कृषीविषयक , तसेच वैद्यकीय , वास्तुशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेशित मुलींच्या पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न हे 8 लाख रुपये पेक्षा कमी आहेत , अशांना हा फायदा होणार आहे . सदर निर्णयाचा फायदा राज्यातील 2 लाख पेक्षा मुलींना होणार आहे , तर सदरची योजना ही सन 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासुन सुरु होणार आहे .

अन्नपुर्णा योजना : या योजनांच्या माध्यमातुन राज्यातील गरजु लाभार्थ्यांना प्रति वर्षाला 03 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना आखण्यात आली आहे , गरीब लोकांना सहाय्यभूत ठरणार आहे .

शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत : राज्यातील सोयाबीन तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 हजार रुपये अर्थसहाय्यक देण्याची मोठी घोषणा सदर अर्थसंकल्पांमध्ये करण्यात आली आहे , त्याचबरोबर कृषी पंपांचे सर्व थकीत बील माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे .

  • शुभमंगल योजनांच्‍या निधीमध्ये 10 हजार रुपये ऐवजी 20 हजार रुपये अशी वाढ करण्याची घोषणा ..
  • महिलांना 10 हजार पिंक रिक्षा तर नविन रुग्णवाहिका खरेदी करण्याची घोषणा ..
  • राज्यांमध्ये 100 विद्यार्थी क्षमता असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व 430 खाटांचे संलग्न रुग्णालयांची स्थापना करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे , यानुसार राज्यांमध्ये नाशिक , जळगाव , धाराशिव , परभणी , हिंगोली , जालना , अमरावती , रत्नागिरी , अंबरनाथ , पालघर , वर्धा , वाशिम , सिंधुदुर्ग येथे शासकीय रुग्णालये स्थापना करण्यास परवानगी देण्यात आली आहे .
  • मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना अंतर्गत राज्यात दरवर्षी 10 लाख तरुण तसेच तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असून , स्टायफंड म्हणून 10,000/- रुपये तरुणांना दिले जाणार आहेत .
  • तसेच संत श्री तुकाराम महाराजांच्या नाव घेत वारी करणाऱ्या वारीच्या दिंडीकरीता 20,000/- रुपयांचा निधी दिला जाणार आहे .
  • राज्यात यंदाच्या वर्षी 25 लाख लखपती दिदी बनविण्याचा राज्य शासनाचा मानस आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *