Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ maharashtara state employee da increase farak calculation ] : राज्य शासन सेवेतील कर्मचारी / निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्तांमध्ये जानेवारी 2024 पासुन 4 टक्के वाढ करणेबाबत , काल दिनांक 10 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , माहे जानेवारी ते जुन पर्यंतच्या डी.ए फरकाची रक्कम ही जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सातव्या वेतन आयोगांमध्ये वेतन / निवृत्ती वेतन घेणाऱ्या कर्मचारी / निवृत्तीवेतनधारकांना जानेवारी 2024 पासुन 46 टक्के वरुन 50 टक्के डी.ए वाढ अशी सुधारणा करण्यात आलेली आहे , यामुळे 4 टक्के महागाई भत्ता वाढीचा फरक अदा केला जाणार आहे . सदर 06 महिने कालावधीमधील डी.ए फरकाची रक्कम किती मिळेल , याकरीत खालील सोपी पद्धतीचा अवलंब करावी .

जानेवारी ते जुन या 06  महिन्यातील डी.ए फरकाची रक्कम काढण्यासाठी – समजा मुळ वेतन हे 50,000/- रुपये असेल  तर  50000 X 4/100 = 2000/- ( यांमध्ये 4 टक्के डी .ए वाढ झाल्याने मुळ वेतनाला 4 टक्केने गुणले असता एका महिन्यांचा डी.ए फरक येईल . )

तर सहा महिन्यांच्या डी.ए फरक रक्कम काढण्यासाठी वरील एका महिन्यांसाठी आलेले डी.ए फरक रक्कम X 06 असे सुत्र वापरावेत , म्हणजेच वरील प्रकरणी 2000 X 6 = 12,000/- ( इतका सहा महिन्याचा डी.ए फरक येईल )

तर वेतनातील डी.ए वाढीमुळे वाढ देखिल 2,000/- रुपये इतकी होणार आहे . अशा पद्धतीच्या सुत्राचा वापर करुन आपले मुळ वेतन X 4/100 = एका महिन्यांसाठी डी.ए फरक त्यास 06 ने गुणल्यास 06 महिन्यांचा डी.ए फरकाची रक्कम प्राप्त होईल .   

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *