Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Mahagai DA Vadh Shasan Nirnay ] : महागाई भत्त्यांमध्ये 4 टक्के वाढ लागु करणेबाबत , राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 19 मार्च 2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

केंद्र शासनांच्या कार्मिक , लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय , निवृत्तीवेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभाग नवी दिल्ली यांच्या क्रमांक 42/04/2024 दिनांक 13 मार्च 2024 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृततीवेतनधारकांच्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आलेली आहे .

केंद्र शासनाच्या कार्मिक , लोक तक्रारी तसेच निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या सदर वरील नमुद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 01 जानेवारी 2024 पासून लागु करण्यात आलेला 4 टक्के वाढीव महागाई भत्यातील दरवाढ त्याचबरोबर ज्ञापनात नमुद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र संवर्गातील आखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्ती वेतनधारकांना तसेच कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांना लागु असणार आहेत .

त्यानुसार आता राज्यातील महाराष्ट्र राज्य संवर्गामधील आखिल भारतीय सेवामधील सेवानिवृत्ती वेतनधारक त्याचबरोबर कुटुंब निवृततीवेतनधारकांना दिनांक 01 जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात येईल .

या संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 19 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *