Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee DA Increase Shasan Nirnay ] : महागाई भत्तांमध्ये चार टक्के वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 13 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
भारत सरकारच्या वित्त मंत्रालय विभागाच्या क्रमांक 01/01/2024 E-II ( B) दिनांक 12 मार्च 2024 च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत ही महाराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवा मधील अधिकाऱ्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाही करीता अग्रेषित करण्यात आलेली आहे .
सदर केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या नमुद ज्ञापनानुसार दिनांक 01 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेल्या 4 टक्के वाढीव दराने महागाई भत्ता व ज्ञापनांमध्ये नमुद करण्यात आलेल्या इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवामधील अधिकाऱ्यांना लागू असणार आहेत , व त्यानुसार दिनांक 01 जानेवारी 2024 पासून 50 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहेत .
या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागांकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
केंद्र शासनाची दिनांक 12 मार्च 2024 रोजीची कार्यालयीन ज्ञापनाची प्रत पुढीलप्रमाणे आहे .