Live marathipepar , प्रणिता पवार प्रतिनिधी [ 7th Pay commission DA VADH GR ] : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी महागाई भत्ता मध्ये वाढ करणे संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर DA वाढ करणे संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहूयात ..
भारत सरकार वित्त मंत्रालय विभागाच्या क्रमांक 01/04 /2023 दिनांक 20 ऑक्टोबर 2023 च्या कार्यालयीन ज्ञापणाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढ संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आली आहे ..
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद ज्ञापनानुसार , दिनांक 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आलेला वाढीव 4 टक्के महागाई भत्ता व कार्यालयीन ज्ञापणात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू असणार आहेत . तसेच दिनांक 01 जुलै 2023 पासून 46 टक्के दराने महागाई भत्ता सदर शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेला आहे .
या संदर्भातील दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहू शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.