Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , संगीता पवार : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सरकारने कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता मध्ये वाढ लागू करण्यात आलेली आहे . या संदर्भात शासनाकडून शासन आदेशही निर्गमित करण्यात आलेला आहे ..

सरकारने बँकिंग कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये किरकोळ दोन टक्क्यांची वाढ लागू करण्यात आलेली आहे .सदर वाढीव महागाई भत्ताचा लाभ बँकिंग कार्यरत कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना लागू करण्यात आला आहे . बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यामध्ये पार पडलेल्या अकराव्या द्वीपक्षीय समझोता अंतर्गत DA वाढ लागू करण्यात आलेले आहेत..

ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे सदर डीए वाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे , बँकिंग कर्मचाऱ्यांना माहे मे ते जुलै 2023 पर्यंत 41.72% महागाई भत्ता दिला जात होता . आता यामध्ये 2.52% वाढ लागू करण्यात आलेली आहे . ज्यामुळे आता सदर कर्मचाऱ्यांना 44. 24 टक्के इतक्या दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे ..

सदरचा वाढीव DA ऑगस्ट ते ऑक्टोबर 2023 या कालावधी करिता असणार आहे . या निर्णयामुळे देशातील कार्यरत बँकिंग कर्मचारी तसेच पेन्शनधारक यांना वाढीव महागाई भत्त्याचा मोठा लाभ प्राप्त झालेला आहे . या संदर्भात सरकारकडून शासन आदेश देखील निर्गमित करण्यात आलेला आहे .

या पाठोपाठ लवकरच इतर सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2023 पासून आणखीन तीन टक्के वाढ लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे .या संदर्भात केंद्र सरकारकडून लवकरच अधिकृत कार्यालयीन ज्ञापण निर्गमित होईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *