लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : महागाई भत्त्यांमध्ये माहे जानेवारी 2023 पासून वाढ करणेबाबत , महाराष्ट्र राज्य शासनांच्या विधी व न्याय विभागांकडून दि.06 जून 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .जानेवारी 2023 पासून डी.ए वाढ रोखीने अदा करण्याचे आदेश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत .
सदर शासन निर्णयानुसार , राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि.01 जानेवारी 2016 पुर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . केंद्र सरकारच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार महाराष्ट्र राज्यातील दि.01 जानेवारी 2016 पुर्वी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना 9 टक्के ( 212% ते 221% ) महागाई भत्ता ( DA ) लागु करण्यात आले आहेत .
सदर शासन निर्णयानुसार राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि.01.01.2016 पुर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि.01 जानेवारी 2023 पासून 221 टक्के दराने डी.ए अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . सदर डी.ए वाढीची रक्कम वरील नमुद सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . याबाबतचा सविस्तर GR पुढीलप्रमाणे आहे ..
महाराष्ट्र राज्य शासनातील इतर सर्व शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषदा ) व इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे चार टक्के डी.ए वाढ करणे बाबत जुन महिना अखेर शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहेत . याबाबत राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून सविस्तर प्रस्ताव देखिल मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची दिलासादायक माहीती समोर येत आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पेन्शनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !