Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ mahagai Bhatta vadh finance department 06 shasan nirnay publish ] : राज्यातील शासकीय व इतर पुर्णकालिक कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना सातवा / सहावा व पाचवा वेतन आयोगांनुसार महागाई भत्तांमध्ये वाढ करणेबाबत वित्त विभागांकडून दिनांक 10 जुलै 2024 रोजी 06 शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सातवा वेतन आयोग : सातवा वेतन आयोगांनुसार वेतन / निवृत्ती वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ताचा दर हा 46 टक्के वरुन 50 टक्के असा सुधारित करण्यात आला आहे .सदर डी.ए वाढ जानेवारी 2024 पासुन लागु असणार आहे .
सहावा वेतन आयोग : असुधारित वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगांनुसार वेतन / निवृत्तीवेतन घेणाऱ्यांना महागाई भत्ता दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन 230 टक्के वरुन 239 टक्के अशी सुधारणा करण्यात आली आहे .
पाचवा वेतन आयोग : असुधारित वेतनश्रेणी पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन / निवृत्तीवेतन घेणाऱ्या कर्मचारी / निवृत्तीवेतनधारकांना 01 जानेवारी 2024 पासुन महागाई भत्ता वाढीचा दर 427 टक्के वरुन 443 टक्के अशी सुधारणा करण्यात आली आहे .
सर्व वेतन आयोगातील वेतन / निवृत्तीवेतन घेणाऱ्यांसाठी दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार आहे . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.