महागाई भत्ता 4% वाढ (एकूण DA 50% ) करणेबाबत शासन निर्णय निर्गमित ; GR दि.26.03.2024

Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ mahagai bhatta increase Shasan Nirnay GR ] महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करणे संदर्भात राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून दिनांक 26 मार्च 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . संचालक केंद्रीय वित्त व व्यय नवी दिल्ली यांच्या दिनांक 12 मार्च 2024 ची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्या संदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आली आहे .

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेली 4% ( चार टक्के)  महागाई भत्त्यातील वाढ व ज्ञापणात नमूद इतर तरतुदी , महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना त्याचबरोबर सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू करण्यात आले आहेत .

त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना त्याचबरोबर सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 50% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे . सदर महागाई भत्त्याच्या वाढीचे रक्कम रोखीने अदा करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत .

यामुळे सदर नमूद अधिकारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक अधिकाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून वाढीव 4% DA व महागाई भत्ता फरकाची रक्कम माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन/ पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येणार आहेत . या संदर्भात राज्य शासनाकडून दि.26.03.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय पुढीप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment