Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ mahagai bhatta increase news ] : केंद्र सहकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे . ती म्हणजे महागाई भत्ता वाढून 57% पर्यंत जाणार आहे .
प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये माहे जानेवारी 2025 पासून तीन ते चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे , याबाबत केंद्र सरकारकडून नवीन वर्षामध्ये घोषणा होवू शकते .
ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या (AICPI) अनुषंगाने विचार केला असता , सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन ते चार टक्के पर्यंत वाढ होऊ शकते सद्यस्थितीमध्ये , केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53% इतका आहे . यामध्ये चार टक्क्यांची वाढ झाल्यास एकूण महागाई भत्ता 57% होईल .
सदर डी. ए वाढ कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2024 पासून लागू केला जाईल , सदरचा लाभ पेन्शनधारकांना देखील लागू होईल . यामुळे केंद्रीय कर्मचारी यांच्या एकूण वेतनामध्ये मोठी वाढ दिसून येईल .
याशिवाय महागाई भत्ता 50% पेक्षा अधिक झाल्याने, घरभाडे (HRA ) भत्ता वाढ करणे संदर्भात अधिकृत निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येईल . यामुळे नवीन वर्षामध्ये महागाई भत्ता वाढीबरोबरच घरभाडे भत्ता मध्ये देखील वाढ होणार आहे .एकंदरीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 2 ते 4 हजार रुपयांची वाढ दिसून येणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.