MAHADBT अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी योजना ! सविस्तर जाणून घ्या व लाभ घ्या !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ MAHADBT Farmer Scheme ] : महाडीबीडी पोर्टल अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असतात , सध्य स्थितीमध्ये कोणकोणत्या योजना राबविण्यात येत आहेत , सदर योजनाकरीता कोणती पात्रता आहे , या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेवूयात ..

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रति थेंब अधिक पिक ( सुक्ष्म सिंचन घटक ) योजना : सदर योजनांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचन घटक खरेदी करण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के तर इतर शेतकऱ्यांकरीता 45 टक्के अनुदान दिले जाते .

कृषी यांत्रिकीकरण उप – अभियान योजना : सदर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकी करणासह प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाणे 2 किलोवॅट / हेक्टर पर्यंत वाढविणे ,याकरीता या योजनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना ट्रॅक्टर , पॉवर टिलर , ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे , बैल चलित यंत्र / अवजारे , प्रक्रिया संच , काढणी पश्चात तंत्रज्ञान , फलोत्पादन यंत्र / अवजारे , वैशिष्ट्यपुर्ण यंत्र अवजारे , स्वयं चलित यंत्रे खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्यक देण्यात येते .

राष्ट्रीय अन्‍न सुरक्षा अभियान – अन्नधान्य , तेलबिया , ऊस व कापुस : या योजनाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना बियाणे वितरण , एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन , एकात्मिक कीड व्यवस्थापन , वैयक्तिक शेततळे , पंप संच , पाईप , विविध कृषी अवजोर या बाबींना अनुदान देण्यात येते . या योजनेचा लाभ हे राज्यातील जिल्हानिय पिके व पात्र जिल्हे यानुसार अनुदान वितरण करण्यात येते .

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ( आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य ) : सदर योजनेच्या माध्यमातुन अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना नविन विहीर करीता 2.50 लाख रुपये , जुनी विहीर दुरुस्ती करीता 50,000/- रुपये , इनवेल बोअरींग करीता 20,000/- रुपये , पंप संच करीता 20,000/- रुपये वीज जोडणी करीता 10,000/- रुपये , तर शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण करीता 01 लाख रुपये , व सुक्ष्म सिंचन संच यांमध्ये ठिबक सिंचन करीता 50,000/- रुपये / तुषार सिंचन करीता 25,000/- रुपये तर पीव्हीसी पाईप करीता 30,000/- रुपये तर परसबाग करीता 500/- अनुदान वितरीत करण्यात येते .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना : या योजनेच्या माध्यमातुन अनुसुचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना नविन विहीर करीता 2.50 लाख रुपये , जुनी विहीर दुरुस्ती करीता 50,000/- रुपये , इनवेल बोअरींग करीता 20,000/- रुपये , पंप संच करीता 20,000/- रुपये वीज जोडणी करीता 10,000/- रुपये , तर शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण करीता 01 लाख रुपये , व सुक्ष्म सिंचन संच यांमध्ये ठिबक सिंचन करीता 50,000/- रुपये / तुषार सिंचन करीता 25,000/- रुपये तर पीव्हीसी पाईप करीता 30,000/- रुपये तर परसबाग करीता 500/- अनुदान वितरीत करण्यात येते .

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : या योजनेच्या माध्यमातुन सर्व शेतकऱ्यांना रोपवाटिका स्थापन करणे , प्रयोगशाळा बळकटीकरण / पुनरुज्जीकरण , भाजीपाला विकास कार्यक्रम , नविन बागांची स्थापना करणे , फलोत्पादन यांत्रिकीकरण , अळिंबी उत्पादन , पुष्प उत्पादन , मसाला पिके लागवड , हरितगृह , सेंद्रिय शेती अशा प्रकारच्या पिकांच्या शेतीकरीता अनुदान उपलब्ध करुन दिले जाते .

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : सदर योजनाच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना फळबाग करीता ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरीता 100 टक्के अनुदान देण्यात येते .

Leave a Comment