Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Mahabank Kisan Emergency Farmer Loan ] : बँक ऑफ महाराष्ट्र ही एक राष्ट्रीयकृत बँक असून , ही बँक शेतकऱ्यांना तातडीच्या गरजेसाठी कृषी मुदत कर्जे उपलब्ध करुन देण्यात येते . ज्यामुळे शेतकऱ्यांच्या तातडीच्या गरजा सहज पुर्ण होतात . या बँकेच्या महाबँक किसान तात्काळ योजनाबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
उद्देश : शेतकऱ्यांच्या तातडीच्या गरजा भागविण्यासाठी महाबँकेकडून किसान तात्काळ योजना राबविण्यात येते . या योजनांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांना किमान 5,000/- रुपये ते कमाल 50,000/- रुपये इतकी रक्कम कर्जे स्वरुपात देण्यात येते .
आवश्यक असणारी पात्रता : महाबँकेच्या या योजनांच्या माध्यमातुन कर्जे घेण्यासाठी वैयक्तिक शेतकरी तसेच संयुक्त कर्जदार ( यांमध्ये 4 पेक्षा अधिक शेतकरी नकोत ज्यांच्याकडे कामकाज करण्याचा 02 वर्षांचा समाधानकारक अनुभव आहे . )
मिळणारी कर्ज स्वरुपातील रक्कम : किमान 5,000/- रुपये तर कमाल 50,000/- रुपये रक्कम कर्जे स्वरुपात मिळते यांमध्ये किसान क्रेडिट कार्डच्या 50 टक्के वार्षिक उत्पन्नाच्या 25 टक्के कमाल मर्यादेच्या अधिन राहून कर्जे पुरवठा करण्यात येते .
व्याजदर ( Rate Of Intrest ) : यांमध्ये 10 लाख रुपये पर्यंत 1 वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ 50% +2% तर 10 लाखांपेक्षा अधिक कर्जपुरवठा करीता 1 वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ 50% +3% इतका व्याजदर आकारण्यात येईल .
कर्जाची परतफेड : पिकाच्या कापणीच्या दरम्यान सहामाही / वार्षिक हप्त्यांमध्ये तीन वर्षांमध्ये सदर कर्जाची परतफेड करणे आवश्यक असेल .
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे : सदरचे तात्काळ कर्ज सुविधाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 7 / 12 , 8 अ उतारा , चतु : सीमा , डी. दाखले , तसेच इतर वित्तीय संस्था / बँकाकडे कोणतेही थकीत नसल्याबाबत प्रमाणपत्र ..
या योजनांच्या माध्यमातुन कर्ज घेण्यासाठी आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेस भेट द्या ..