Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maha Agro Apps Launch ] : शेतकऱ्यांच्या उत्पादनांकरीता आता राज्य सरकारकडून ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करुन देण्यात आलेले आहेत , यांमुळे आता शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांची ऑनलाईन पद्धतीने विक्री करता येणार आहेत .
महा ॲगो ॲपद्वारे आता खरेदी करण्यात आलेल्या वस्तु थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याकरीता राज्य शासनांकडून व भारती टपाल खात्यांकडून सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेले आहेत . राज्याचे कृषीमंत्री ना.धनजंय मुंडे म्हणाले आहे कि , इलेक्ट्रॉनिक पेमेंट व मोबाईल इंटरनेट सुविधांमुळे ई-कॉमर्सला सर्वाधिक फायदा झालेला आहे . भारतातील ई-कॉमर्स प्रणाली भविष्यात मोठ्या प्रमाणात विकसित होईल , ज्यांमुळे ई-कॉमर्स 250 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची मोठी शक्यता आहे .
या आधुनिक तंत्रज्ञानांचा राज्यातील शेतकऱ्यांना व कृषी क्षेत्राला फायदा व्हावा याकरीता इलेक्ट्रॉनिक कॉमर्स मोबाईल ॲप व वेब प्लॅटफॉर्म उलब्ध करुन देण्याचा राज्य शासनांचा प्रयत्न होता , सदर महा ॲग्रो ॲप्सच्या माध्यमातुन हा प्रयत्न साकार झाला आहे .
या ॲप्सच्या माध्यमातुन राज्यातील बचत गट , स्वयं सहाय्यकता गट , शेतकरी , स्टार्टअप तसेच लहान – मोठे व्यावसायिक , शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्यांची शेती उत्पादने , तसेच प्रक्रिया करण्यात आलेले उत्पादने व शेतीशी निगडीत असणारी उत्पादनांची ऑनलाईन विक्री करता येणार आहे , यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे कृषी मंत्री धनंजय बोलताना सांगत होते .
सदरचे ॲप्स लाँच झाल्याच्या दिवशीच 358 उत्पादकांची तब्बल 1370 उत्पादने सदर ॲप्सवर विक्रीकरीता उपलब्ध करुन देण्यात आले . सदर ॲप्सवर उत्पादनांच्या विक्रीबरोबरच हवामान खात्यांची माहिती देखिल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत , तसेच राज्य कृषी पणन मंडळ मार्फत विविध प्रकारच्या कृषी मालाचे दैनिक भाव देखिल सदर पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्र्यांनी दिली आहे .
महा ॲग्रो ॲप्स डाउॅनलोड कसे करावेत ? : महा ॲग्रो हे ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर मध्ये Maha Agro Mart असे नाव टाईप करुन डाऊनलोड करु शकता , या ॲप्सच्या माध्यमातुन ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देखिल करता येते .