Spread the love

Live Marathipepar प्रणिता पवार [ L’Oreal India Scholarship Scheme ] : L’Oreal India कंपनी मार्फत देशातील तरुण विद्यार्थीनींना प्रोत्साहन देण्यासाठी 12 वी नंतर पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचण निर्माण होवू नये याकरीता शिष्यवृत्ती दिली जाते . सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता L’Oreal India कंपनीकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . शिष्यवृत्तीची संपुर्ण माहिती अर्ज प्रक्रिया या संदर्भात परिपुर्ण माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

सदर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता : सदर शिष्यृत्ती हि केवळ विद्यार्थीनींसाठी ( मुलींसाठी ) आहे . मुली ह्या शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतुन PCM /PCB /PCMB विषय घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच 12 वी मध्ये 85 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

तसेच विद्यार्थीनी ही 12 वी नंतर गॅप दिली नसावी तर चालु वर्षांमध्ये विज्ञान शाखेतील पदवी / समतुल्य विज्ञान अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असावी .तसेच पालकाचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न हे 6,00,000/- रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहेत .गॅप असल्यास आवेदन करण्यास अपात्र ठरेल .

शिष्यवृत्तीचे आर्थिक स्वरुप : यामध्ये विद्यार्थींस 2,50,000/- रुपये इतकी शिष्यवृत्ती देण्यात येते . सदर शिष्यवृत्ती ही विद्यार्थींस पदवी काळांमध्ये येणाऱ्या शैक्षणिक खर्चांसाठी आर्थिक सहाय्यक करण्यात येते . सदर शिष्यवृत्ती ही विद्यार्थींच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येते .

आवश्यक कागतपत्रे : सदर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड / जन्म प्रमाणपत्र / पासपोर्ट / मतदान कार्ड , पालकाचे मागील वर्षाचे उत्पनाचा दाखला , 10 वी / 12 वी चे मार्कशिट , पासपोर्ट साईज फोटो , चालु वर्षाचे बोनाफाईट / ओळखपत्र इ.

असा करा आवेदन : पात्र विद्यार्थीनींनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी खाली नमुद संकेतस्थळावर दिनांक 07 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचा आहे .

अधिक माहितीसाठी / आवेदन सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

APPLY NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *