Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ loksabha election 2024 Bhavishyavani ] : लोकसभा निवडणूका 2024 निकालाबाबत अनेक तर्क -वितर्क लावण्यात येत आहेत . यांमध्ये प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते यांनी राज्यातील लोकसभेच्या निकालाबाबत आपली भविष्यवाणी केली आहे .
राज्यांमध्ये यंदाच्या वेळी मोदी लाट बरीचशी ओसरली आहे , यामुळे भारतीय जनता पार्टीला यंदा मोठ्या संकटाचा सामना करावा लागला . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहेत . सध्या राज्यांमध्ये तीन वेगवेगळ्या ( गटांचे ) पक्षांची सत्ता आहे , यामुळे यंदा मतदारांना नेमका कोणाला मत द्यायचे याबाबत संभ्रम निर्माण करत आहेत .
अनिल थत्ते हे एक प्रसिद्ध ज्योतिषी आहेत , त्यांची भविष्यवाणीवर अनेकांचा विश्वास आहे , याबाबत त्यांनी केलेली भविष्यवाणी मध्ये अजित पवार गटाला एकाही जागेवार यश मिळणार नसल्याचे , भविष्यवाणीमध्ये सांगतले आहे . तर या निवडणूकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे भाकित करण्यात आलेले आहेत .
राज्यांमध्ये महायुती सरकारला तब्बल 37 ते 40 जागेवर विजय मिळेल अशी भविष्यवाणी ज्योतिषी अनिल थत्ते यांनी केली आहे . यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहे कि , महायुतीला 37 जागा मिळाल्या तर उर्वरित जागा ( 48 जागांपैकी ) ह्या महाविकास आघाडी मिळेल . महाविकास मध्ये शिवसेना ठाकरे गट नंतर शरद पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ) गटाला जागा संपादन होणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
भविष्यवाणी मध्ये नमुद केल्याप्रमाणे राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी महायुतीला 37 ते 40 जागा तर महाविकास आघाडीला 08 ते 13 जागा मिळतील असे भाकित ज्योतिषी अनिल थत्ते यांनी केली आहे .