Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lokasabha Election Employee Pay & Other Allowance Update ] : लोकसभा निवडणूक 2024 कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना मानधन देणेबाबत भारत निवडणूक आयोगांकडून अधिकृत्त पत्र निर्गमित करण्यात आलेले असून , सदरच्या परिपत्रकानुसार कामकाजाच्या पदानुसार व दिवसानुसार मानधन नमुद करण्यात आलेले आहेत .
सदरच्या परिपत्रकानुसार मतदान केंद्राध्यक्ष , व इतर मतदान अधिकारी ( पहिला / दुसरा / तिसरा ) यांना प्रशिक्षण , मतदान साहित्य गोठा करणे याकरीता 4 दिवसांचे मानधन देण्यात येणार आहेत , तर प्रत्यक्ष मतदानाचे 02 दिवस असे एकूण 6 दिवसाचे मानधन अदा करण्यात येणार आहेत . तर राखीव असणाऱ्यांना 04 दिवस प्रशिक्षण कामी तर 01 दिवस मतदानाचा असे एकूण 05 दिवसाचे मानधन अदा करण्यात येणार आहेत .
यांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष यांना 06 दिवसांचे 350/- प्रमाणे 2100/- + मतदानाचे 02 दिवसाकरीता आहार भत्ता म्हणून प्रति दिवस 150/- रुपये असे 300/- रुपये , असे एकूण 2500/- रुपये मिळतील .
तर मतदान अधिकारी ( 1 , 2 , 3 ) यांना 06 दिवसांचे 250/- रुपये प्रमाणे 06 दिवसांचे 1500/- रुपये तर मतदानाच्या 02 दिवसांचे आहार भत्ता म्हणून 150/- प्रमाणे ( 02 दिवसांचे ) 300/- रुपये असे एकूण 1800/- रुपये मिळतील .
तर चतुर्थ श्रेणी मधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा 01 दिवस व मतदानाचे 02 दिवस असे एकूण 03 दिवसांचे 200/- रुपये प्रमाणे 600/- रुपये तर प्रत्यक्ष मतदानाच्या 02 दिवसांचे आहार भत्ता म्हणून 300/- रुपये असे एकूण 900/- रुपये दिले जाईल .
तर पोलिस शिपाई पदांस प्रशिक्षणाचा एक दिवस प्रत्यक्ष मतदानाचे 02 दिवस असे एकूण 03 दिवसांचे मानधन ( 250/- रुपये प्रमाणे ) तसेच आहार भत्ता ( दोन दिवसांचे ) 300/- रुपये असे एकूण 1050/- रुपये मानधन देण्यात येईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.