लोकसभा निवडणूक कामी नियुक्ती अधिकारी / कर्मचाऱ्यांना मिळणार या सुविधा , परिपत्रक निर्गमित !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lokasabha Election duty Employee Facility ] : लोकसभा निवडणूक कामी नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

मतदान पथकातील कर्मचारी हे मतदान केंद्रावर पोहल्याच्या नंतर पथकातील 4 मतदान कर्मचारी , 1 चतुर्थश्रेणी कर्मचारी व 1 पोलिस कर्मचारी असे एकूण 6 कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे , सदर 6 कर्मचारी शिवाय BLO व आशा वर्कर अथवा अंगणवाडी सेविका असे कर्मचारी असणार आहेत .

सदर कर्मचारी मतदान केंद्रावर अगोदरच्या दिवशी उपस्थित झाल्याच्या नंतर मतदान पथकास स्वच्छ पिण्याचे पाणी , सायंकाळी 5.00 वाजता चहा , रात्रीचे भोजन व मच्छर अगरबत्तीची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच मतदान पथकातील कर्मचाऱ्यांसाठी आवश्यकता नुसार अंघोळीकरीता गरम पाणी , चहा , नाश्ता व दुपारी भोजन तसेच सायंकाळी चहा व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदर मतदान पथकातील कर्मचाऱ्यांसाठी वरील नमुद व्यवस्था करण्यासाठी संबधित तलाठी यांना प्रत्येक मतदान केंद्राकरीता रुपये 2100/- रुपये ( अक्षरे दोन हजार शंभर रुपये ) इतका निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . सदर मतदान केंद्र हे ज्या सज्जा केंद्र अंतर्गत आहे त्या तलाठी यांनीच सदर व्यवस्था करायची असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच संबंधित मंडळ अधिकारी यांनी या सर्व कामकाजाचे सनियंत्रण करण्याचे सुचित करण्यात आलेले आहेत . सदर कामकाजांमध्ये टाळाटाळ केल्यास , लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई अनुसरण्यात येईल असे निर्देश देण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment