Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lokasabha Election Cadidate List Publish 2024 ] : लोकसभा निवडणुका 2024 करीता देशातील तब्बल 195 उमेदवारांची यादी घोषित करण्यात आलेली आहे . या पहिल्या यादीमध्ये विशेष म्हणजे देशातील सर्वाधिक चांगल्या पद्धतीने कार्य करणाऱ्या मा.मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घोषित करण्यात आलेले नाहीत .
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव श्री.विनोद तावडे यांनी काल दिनांक 02 मार्च 2024 रोजी लोकसभा निवडणुक 2024 करीता 194 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे , या यादीमध्ये विद्यमान 34 मंत्र्यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे , परंतु या पहिल्या यादींमध्ये भावी पंतप्रधानांचे दावेदार असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्थान दिले नसल्याचे दिसून येत आहेत . यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहेत .
या यादीमध्ये देशाचे विद्यमान पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी ( उत्तर प्रदेश ) लोकसभा मतदार संघ मधून निवडणुक लढवणार आहेत . तर अमित शहा यांना गुजरात गांधी नगर मधून उमेदवारी घोषित झाली आहे . तर यादीमध्ये एकुण 28 महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे . यांमध्ये हेमा मालिनी , यांना मथुरा या लोकसभा मतदार संघातुन उमेदवारी देण्यात आलेली आहे .
या यादींमध्ये एकुण 47 युवा उमेदवारांना स्थान देण्यात आलेले आहेत , तर 28 जागांवर अनुसुचित जातींमधील उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे . या शिवाय एकुण 57 जागां इतर मागास प्रवर्ग करीता देण्यात आलेले आहेत . यांमध्ये 02 माजी मुख्यमंत्री यांचा देखिल समावेश आहे .