Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Loksabha Election Acharsanhita Rules ] : आचारसंहिता कालावधीमध्ये काय करावेत व काय करु नयेत याबाबत भारत निवडणुक आयोगांकडून निर्गमित करण्यात आलेल्या अधिकृत्त सुचना पत्रकांमध्ये खालील बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे .

सत्तेत असणारे राजकीय पक्षाचा मतदारांवर प्रभाव पडेल असे नविन प्रकल्प अथवा कार्यक्रम अथवा कोणत्याही स्वरुपातील सवलती अथवा वित्तीय अनुदाने घोषित करणे अथवा त्यांची आश्वासने देणे किंवा त्याची कोनशिला बसविणे इ.करण्यास मनाई असेल .शासकीय योजनांच नव्याने मंजुरी देण्यात येणार नाही , तसेच लाभार्थी योजनांचे जरी त्या चालु असल्या तरी राजकीय कार्याधिकाऱ्यांद्वारे घेण्यात येणारा आढावा व लाभाभिमुख योजनांचे संस्करण , निवडणुका पुर्ण होईपर्यंत थांबविण्यात यावेत .

आदर्श आचार संहिता अंमला येण्यापुर्वी कामाचे आदेश देण्यात आले असले तरी जर क्षेत्रांमध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आली नसेल तर असे कोणतेही काम सुरु करण्यात येणार नाही , ही कामे निवडणुक प्रक्रिया पुर्ण झाल्याच्या नंतर केवळ सुरु करता येवू शकतील . तर एखादे काम हे प्रत्यक्षात सुरु करण्यात आले असतील तर ते कामकाज चालु ठेवता येवू शकेल .

आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीच्या कामकाजाशी संबंधित असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या / कर्मचाऱ्यांच्या बदलीवर पुर्णपणे बंदी असेल .तसेच निवडणुक प्रचार कामाकाजासाठी शासकीय वाहनांचा वापर करता येवू शकणार नाही .

स्थानिक पोलिस प्राधिकाऱ्यांना सभांची जागा व वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देवून आवश्यक ती परवानगी घेणे आवश्यक असेल . प्रस्तावित सभेकरीता ध्वनीवर्धकाचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी घेण्याची आवश्यक असेल .

काय करुन नयेत ? : सदर आचार संहिता कालावधीमध्ये सत्ताधारी पक्ष / शासन यांनी केलेल्या कामगिरी विषयी सरकारी राज्य कोषातील खर्चाने कोणतीही जाहीरात व सर्व जाहीराती काढण्यास प्रतिबंध असणार आहे . तसेच कोणताही मंत्री अथवा उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार म्हणून आला असेल त्या शिवाय मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही .

शासकीय कामाची निवडणुक मोहिम / निवडणुक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करुन नयेत . मतदाराला पैशाचे अथवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवू नयेत , मतदारांच्या जातीय समुह भावनांना आवाहन करु नयेत . जातीय ,  धार्मिक ,भाषिक भेदभाव करु नयेत .ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेवू नयेत .मिरवणूकीतील लोक , शस्त्र म्हणून ज्याचा दुरुपयोग केला जावू शकतो अशा कोणत्याही वस्तु जवळ बाळगण्यात येवू नयेत ..

आचारसंहिता संदर्भात काय करावेत व काय करु नयेत या बाबतचा सविस्तर सुचना पत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..

आचारसंहिता सूचना पत्रक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *