Spread the love

Farmer Loan : शेती करत असताना शेतकरी वर्गाला कित्येकदा भांडवलाची गरज भासत असते. अशावेळी शेतकरी कुठून तरी कर्ज उपलब्ध करून घेण्याचा विचार करतात. परंतु कर्जाविषयी काही विशेष माहिती शेतकऱ्यांना माहीत नसते. त्यामुळे कर्ज घेत असताना शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शेतकरी वर्गाला खास त्यांच्यासाठी राबवलेल्या एका खास कर्ज सुविधा विषयी माहिती असणे गरजेचे आहे (Loan for farmers from Government). तर त्या कर्ज सुविधाची नाव आहे पीक कर्ज सुविधा. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची ठरणारी कर्ज सुविधा ही शेतकऱ्यांच्या नक्कीच फायद्याचे आणि अडीअडचणीमध्ये कामाची सुविधा आहे. चला तर मग या कर्ज सुविधा विषयी तपशील वर माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. जेणेकरून शेतकऱ्यांना अगदी बिनधास्तपणे कर्ज घेता येईल आणि कोणताही अडथळा येणार नाही.

प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा आढावा घेऊन शेतकरी वर्ग अगदी बिनधास्तपणे काम करत आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहारा सुद्धा मिळत आहे. परंतु कित्येकदा आपण बघितले असेल की शेतकऱ्यांना विविध सुविधा किंवा योजनांचा लाभ घेता येत नाही (Loan for farmers in maharashtra). कितीदा शेतकऱ्यांना या गोष्टीसाठी अडथळा येत असतो. त्याच सोबतच शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेत जमिनीवर कर्ज काडत असताना सुद्धा अडथळा व अडीअडचणींचा सामना करावा लागतो. तुमच्याकडे एक एकर क्षेत्र असेल तर त्यावर किती कर्ज मिळू शकते? याविषयी आपण जाणून घेऊया.

आता होईल ट्विटर वरून कमाई! ट्विटरने काढले नवीन फिचर; पहा संपूर्ण माहिती;

एक एकर जमिनीवर नक्की किती कर्ज मिळू शकते ? सर्वसाधारणपणे जमिनीच्या एकूण क्षेत्राचा विचार केला तर एक एकर क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त शेतकरी वर्गाला 30 हजार ते 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. परंतु यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे त्यांना या माध्यमातून कमीत कमी 50 हजार ते जास्तीत जास्त तीन लाखांचे कर्ज अगदी बिनधास्तपणे उपलब्ध करून घेत आहेत (land loan for agriculture). म्हणजे मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड हे तुमच्यासाठी किती फायद्याचे ठरणार आहे या माध्यमातून तुम्हाला कर्ज जास्त घेता येते. परंतु त्यावर व्याजदरही तितकाच असणार आहे. त्यामुळे बँकेमध्ये व्यवस्थित रित्या चौकशी करूनच कर्ज उपलब्ध करून घ्यावे.

ज्या शेतकऱ्यांना बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून मिळणार आहे त्या कर्जाचे स्वरूप हे पूर्णपणे त्याच्या उत्पन्नावर, त्यांच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रफळावर, सोबतच मागील वर्षाचे जे काही पीक असेल त्यावर अवलंबून असते. किसन क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला प्रत्येक वर्षी सात टक्के व्याज दराने कर्ज मिळत आहे (land loan interest rates). यासोबतच तुम्ही वेळोवेळी या कर्जाची परतफेड केली असेल तर शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी तीन टक्क्यांची सवलत मिळत आहे आणि ही सवलत थेट प्रशासनाच्या माध्यमातून दिली जात आहे  यासाठी वेळोवेळी कर्जाची परतफेड करणे बंधनकारक आहे.

येथे क्लिक करून पहा 10 वि आणि 12 वि चे वेळापत्रक;

तर आम्ही खास तुमच्यासाठी विविध लेख नियमितपणे घेऊन येत आहोत. या लेखांच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती आम्ही नियमितपणे तुम्हाला देत आहोत. यामध्ये विविध प्रकारच्या शासकीय योजना आणि कर्ज सुविधा, यासोबतच भरती विषयी माहिती, शासकीय नोकरदार करिता सोबतच सध्याच्या सुरू असणाऱ्या चालू घडामोडी आणि महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यासाठी नियमितपणे घेऊन येत आहोत (Which Bank is best for land loan). तरी तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचे सर्व लेख शेअर करावेत आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी, धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *