Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ lic Saral Pension Scheme ] : भारतीय आयुर्विमा कंपनीच्या एलआयसी सरल पेन्शन योजनांमध्ये फक्त एकदाच गुंतवणुक केल्यास आयुष्यभर प्रतिमहा 12,388/- रुपये पेन्शन मिळेल , या योजना बद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

सरल पेन्शन योजनेचे खास वैशिष्ट्ये :  या पेन्शन योजनेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे पेन्शन योजना सर्व वयोगटातील ग्राहकांसाठी लागु असून , सर्वच ग्राहक या योजनेच्या माध्यमातुन लाभ घेवू शकता .खास करुन ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक फायदेशिर ठरते , तसेच ही पॉलिसी घेतल्यानंतर आपणास फक्त एकाच वेळेस प्रिमियमची रक्कम भरावी लागते . यांमध्ये जेवढी रक्कम आपण प्रिमियम म्हणून भरतो , तेवढीच रक्कम आपल्याला पॉलीसी संपल्यानंतर मिळते .

 पॉलिसीचा लाभ कसा मिळतो :  या पॉलिसी योजना अंतर्गत आपणांस पॉलिसी  धारकांच्या मृत्युनंतर पॉलिसीची संपुर्ण रक्कम नॉमिनीला दिली जाते . यांमध्ये आपण एकदा प्रिमियम भरल्याच्या नंतर आपणांस मासिक , त्रेमासिक , सहामाही पद्धतीने पेन्शन प्राप्त करु शकता . जर आपले वय हे 42 वर्षे असेल आणि आपण 30 लाख रुपये रक्कमेचे एन्युटी घेतले असल्यास , आपणांस प्रतिमहा 12,388/- रुपये पेन्शन मिळेल . यांमध्ये आपण किमान 1000/- ते प्रतिमहा 12,388/- रुपये रक्कमेचे पेन्शन मिळवू शकता ..

वयोमर्यादा : या योजनेचा लाभ घेण्याकरीता उमेदवाराचे किमान वय हे 40 वर्षे तर कमाल वय हे 80 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . म्हणजेच ही सरल पेन्शन योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी बनविण्यात आलेली आहे .

एकदा प्रिमियम भरल्याच्या नंतर आपण सहा महिन्याच्या नंतर पॉलिसी सरेंडर देखिल करु शकतो , त्याचबरोबर या पॉलिसी योजनावर आपण कर्ज देखिल मिळवू शकतो . यामुळे ही सरल पेन्शन योजना अधिक फायदेशिर आहे . म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी बँकेत मुदत ठेव करण्यापेक्षा या पेन्शन योजनांमध्ये गुंतवणुक केल्यास आपणांस अधिक आर्थिक लाभ प्राप्त होईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *