Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ lic new term insurance plan ] : भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत नविन टर्म प्लान लाँच करण्यात आलेला आहे , ज्यांमध्ये कमी प्रिमियम मध्ये सर्वाधिक लाभ मिळणार आहे .सदर प्लानचे सविस्तर वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

सदर प्लान मध्ये कमी खर्चात उच्च विमा संरक्षणाचा लाभ मिळतो , त्याचबरोबर आर्थिक सुरक्षा प्राप्त होते , तसेच पेमेंट करण्याचा पर्याय हा लवचिक आहे , तर यांमध्ये महिला तसेच तंबाखु सेवन न करणाऱ्यांसाठी विशेष दराची तरतुद करण्यात आलेली आहे . तसेच अपघात लाभ रायडरचा पर्याय उपलब्ध करण्यात आलेला आहे .

सदरचा नविन तांत्रिक मुदत विमाचा प्लॅन का खरेदी करावा ? : सदर मुदत विमा हा एक प्रकारचा सरळ जीवन विमा उत्पादन आहे जे एका ठराविक काळासाठी म्हणजेच पॉलिसी मुदतीत जोखीम कव्हरेज प्रदान करतो . तसेच विमाधारकाच्या मृत्युवर मृत्यु लाभ देवून त्यांच्या लाभार्थ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यात येते .या प्लॅनचे खास वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत .

कमी प्रिमियम मध्ये उच्च जोखीम संरक्षण : या प्लॅन मध्ये कमी प्रिमियम मध्ये उच्च जोखीम कव्हरेज मिळते . यामुळे एखाद्याच्या आर्थिक पोर्टफोलिओचा आधारस्तंभ मानले जाते .

अवलंबितांना /वारसदारांना आर्थिक मदत : या प्लॅनमध्ये विमाधारकाचा जर दुर्देवी निधन झाल्यास अशा वेळी मोल्यवान आर्थिक सहाय्य दिले जाते तसेच आश्रितांना त्यांच्या जीवन शैली टिकवून ठेवण्यास तसेच आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य करण्यात मदत करु शकतात ..

या विमा योजनचे ठळक मुद्दे : संरक्षण योजना – टर्म प्लॅन – नविन तंत्रज्ञान टर्म – ऑनलाईन योजना , असे या विमा योजनांचे ठळक मुद्दे आहेत . याबाबत अधिक माहितीकरीता  https://licindia.in/hi/ या संकेतस्थळाला भेट देवू शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *