Spread the love

लाईव्ह मराठी पेपर , प्रणिता पवार : भारतीय आयुर्विमा महामंडळाने वयोगटानुसार सेवानिवृत्तीनंतर ज्या प्रमाणात पेन्शन हवी आहे त्या-त्या मागणीनुसार पेन्शन योजना तयार करण्यात आलेली आहे , या पेन्शन योजनामध्ये फक्त एकाच वेळी गुंतवणुक करुन , आयुष्यभर पेन्शनचे टेन्शन विसरुन जावू शकता ..

भारतीय आयुर्विमा महामंडाकडून LIC नविन जीवन शांती योजना ( LIC NEW JEEVAN SHANTI SCHEME )  सुरुवात केली आहे ज्यांमध्ये तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शनची कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही .या पेन्शन योजनांमध्ये फक्त एकाच वेळी गुंतवणुक करुन आयुष्यभर पेन्शनचा लाभ घेवू शकता .

भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून नविन जीवन शांती योजना ही साधारण गुंतवणुक योजना म्हणून तयार करण्यात आलेली होती , परंतु नागरिंकाची होणारी गुंतवणुक व हित लक्षात घेता या योजनेचा समाविष्ट ही पेन्शन योजनांमध्ये करण्यात आली आहे . या पेन्शन योजना मध्ये लाईफ-टाईम पेन्शनची हमी मिळत असते .ही योजना एक प्रकारची एन्युटी स्किम आहे , ज्यांमध्ये आपल्याला सेवानिवृत्तीनंतर ज्या प्रमाणात पेन्शन हवी आहे ते देखिल निश्चित करता येते .

यांमध्ये आपल्याला एकाच वेळी पेसांची गुंतवणुक केल्यास किमान 1-5 वर्षे कालावधीचा लॉक – ईन काळ असतो , त्यानंतर आपल्याला दरमहा पेन्शन आयुष्यभर मिळत असते . या पेन्शन योजनांमध्ये कमाल गुंतवणुक करण्याची कोणतीही मर्यादा नसून , या स्किमचा लाभ घेण्याकरीता किमान 1.5 लाख रुपये निश्चित करण्यात येत असते . तसेच या पेन्शन योजनाचा लाभ घेण्यासाठी किमान वय हे 30 वर्षे तर कमाल वय हे 79 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : खुशखबर : सरकारी कर्मचाऱ्यांना मागील 18 महिने कालावधीमधील डी.ए थकबाकी रक्कम मिळणार ?

यांमध्ये दोन प्रकारांमध्ये प्लॅन खरेदी करण्याची मुफा आहे , यांमध्ये सिंगल लाईफ आणि दुसरी म्हणजे डेफर्ड फॉर जॉईंट लाईफ . यांमध्ये किामन 1.5 लाख रुपयांची गुंतवणुक केल्यास आपल्याला दरमहा 1,000/- पेन्शन निश्चित होते तर एकाच वेळी आपण 10 लाख रुपयांची गुंतवणुक केल्यास आपल्याला प्रतिमहा 11,192/- रुपये पेन्शन निश्चित होईल .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *