Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ LIC JEEVAN SHANTI YOJANA ] : भारतीय आयुर्विमा महामंडळाची खास जीवन शांती योजनांमध्ये फक्त एका वेळेची गुंतवणुकीनंतर आपणांस आयुष्यभर प्रतिमहा 11,192/- रुपये इतकी पेन्शन मिळणार आहे , या योजनेची पात्रता , मिळणारे लाभ या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

एलआयसी ची नविन जीवन शांती योजना : या आयुर्विमा योजनांमध्ये आपणांस प्रतिमहा आर्थिक लाभ मिळत असतो , आपणांस आयुष्यभर पेन्शन हवी असल्यास आपणांसाठी ही योजना अत्यंत लाभदायक ठरणार आहे , ज्यामुळे आपले भविष्य अधिक सुखकर होईल . या योजनांमध्ये आपणांस प्रतिमहा पेन्शन मिळणार असल्याने , आपले मासिक खर्च तसेच निवृत्तीनंतर पैसांची अडचण दुर होणार आहे .

पात्रता : या योजनांमध्ये आपण किमान 1.50 लाख रुपये इतकी रक्कम गुंतवू शकता , तर कमाल गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा असणार नाही . तर योजनांमध्ये वय वर्षे 30 ते 79 वयोगटातील व्यक्ती गुंतवणुक करु शकतात . यांमध्ये आपण संयुक्त पद्धतीने देखिल खाते उघडु शकतो , ज्यांमध्ये एकाचा मृत्यु झाल्यानंतर दुसऱ्यांस या योजनांतर्गत लाभ सुरु राहतील .

मिळणारे आर्थिक लाभ ( Benefit ) : या योजना अंतर्गत आपण जर किमान 1.50 लाख रुपये इतकी गुंतवणुक केल्यास , आपणांस प्रतिमहा 1000/- रुपये इतकी रक्कम आयुष्यभर पेन्शन निश्चित केली जाईल , तर आपण यांमध्ये रुपये 10 लाख इतकी रक्कम गुंतवल्यास , आपाांस प्रतिमहा 11,192/- रुपये इतकी रक्कम आयुष्यभरासाठी प्रतिमहा पेन्शन निश्चित करण्यात येईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *