Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ LIC Monthly Income Scheme ] : भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत , फक्त एकाच वेळी पैसे गुंतवणुक करुन आयुष्यभर दर महिन्याला 12,000/- रुपये मिळविता येणार आहेत , या योजनाबद्दल सविस्तर माहीती आपण पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

भारतीय आयुविर्मा महामंडळ ही केंद्र सरकारच्या अधिनस्थ असल्याने , जनतेचा मोठा विश्वास यावर आहे , यामुळे यांमध्ये गुंतविण्यात आलेली रक्कम अधिक सोयीस्कर व जोखीम फ्री समजण्यात येते . यांमध्ये अनेक प्रकारचे पॉलिसी प्लान आहेत , यापैकी प्रतिमहा उत्पन्न मिळविण्याच्या हिशोबाने भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत सरल पेन्शन योजना राबविण्यात येते . या पॉलिसी प्लान मध्ये आपणांस दरमहा उत्पन्न मिळत असतो .

सरल पेन्शन योजना : सरल पेन्शन योजनाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याची कोणतीही कमाल मर्यादा नाही , तर कोणताही भारतीय व्यक्ती ज्याचे वय हे 40 ते 80 वयोगटातील आहेत , असे नागरिक या योजनांमध्ये गुंतवणुक करु शकतात .

हे पण वाचा : सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या 1000+ संधी , Click Here !

दरमहा 12,000/- उत्पन्न कसे मिळणार : यांमध्ये एकाच वेळी प्रिमियमची रक्कम भरावी लागते , त्यानंतर आपणांस प्रतिमहा उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते . जर समजा या पॉलिसी योजनांमध्ये आपण 30 लाख रुपये ( तीस लाख रुपये ) एकाच वेळी गुंतविली असता , आपणांस दरमहिन्याला 12,388/- रुपये इतका वार्षिक लाभ प्राप्त होणार आहे . ते मासिक उत्पन्न आपणांस आयुष्यभर घेता , येईल . विमाधारकाचा मृत्यु झाल्यास सदर सर्व विमा रक्कम वारसदारांस मिळते .

जर आपणांस सदर मासिक उत्पन्नाची रक्कम ही मासिक पद्धतीने घ्यायची नसल्यास , आपणांस त्रेमासिक , वार्षिक पद्धतीने देखिल लाभ घेवू शकता .. या योजनांच्या माध्यमातुन आपणांस लाभ घ्यायचा असल्यास , विमा ऐजंला अथवा www.licindia.in या संकेतस्थला भेट द्या ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *