Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ New Jivan Utsav Policy Plan ] : भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी जीवन उत्सव योजना 871 लाँच केली आहे . ही स्किम एक प्रकारची पारंपारिक योजना असून , या योजनेचा शेअर बाजाराशी कोणताही प्रकारचा संबंध नसून , या अंतर्गत विमा , बचत तसेच निवृत्तीवेतन अशा बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे .
या पॉलिसी अंतर्गत आपणास 05 वर्षे ते 16 वर्षे पर्यंत प्रिमियम भरण्याची मुफा असते , तसेच यांमध्ये आपणांस नियमित उत्पन्न लाभ अथवा फ्लेक्सी उत्पन्न लाभ अशा प्रकारचा लाभ घेण्याचे 02 पर्याय उपलब्ध करुन देण्यात येते . या योजनांची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
सदर योजनांच्या माध्यमातुन किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय 100 वर्षापर्यंत लाभ घेवू शकता . यांमध्ये नियमित उत्पन्न तसेच फ्लेक्सी उत्पन्न घेण्याचा लाभ निवडण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत . या पॉलिसी अंतर्गतर आपण किमान 05 वर्षे तर कमाल 16 वर्षापर्यंत प्रिमियम रक्कम भरण्याचा पर्याय निवडू शकता .. सदर पॉलिसी ही 90 दिवसांच्या लहान मुलापासून ते वयाच्या 65 वर्षापर्यंतच्या व्यक्तीकरीता पॉलिसी घेता येते .
जर आपण या पॉलिसी अंतर्गत 10 लाख रुपये विमा रक्कमेची पॉलिसी खरेदी केली असता , व आपले वय यावेळी 25 वर्षे असेल तर आपणांस 12 वर्षे प्रिमियम टर्म सह पर्याय निवडल्यास , आपणांस 12 वर्षापर्यंत प्रिमियम भरावा लागेल यांमध्ये आपणांस पहिल्या वर्षी 92,535/- प्रिमियम तर दुसऱ्या वर्षी पासून ते 12 व्या वर्षापर्यंत 90,542 रुपये इतका प्रिमियम भरावा लागेल . यांमध्ये आपली मुदत ही 37 व्या वर्षी पुर्ण होईल , म्हणजेच आपणांस 39 व्या वर्षांपासून 100 व्या वर्षापर्यंत 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा लाभ मिळेल , जो कि विमा रक्कमेच्या 10 टक्के इतका हिस्सा असेल .
मृत्यु लाभ : जर पॉलिसीधरकाचा मृत्यु झाल्यास पॉलिसीधारकाच्या मृत्युच्या तारेखपर्यंत भरलेले एकूण प्रिमियम रक्कमेच्या 105 टक्के रक्कम प्राप्त होते .