Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ LIC JIVAN AKSHAY POLICY ] : भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत विविध प्रकारच्या पॉलिसी दिल्या जातात ,यामध्ये दरमहा वीस हजार रुपये देणारी पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास आयुष्यभर फायदा होणार आहे , चला तर मग या पॉलिसी बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया .

जीवन अक्षय पॉलिसी ; या पॉलिसीचे नाव जीवन अक्षय असे आहे ,या पॉलिसीच्या माध्यमातून गुंतवणूक करून चांगल्या प्रकारचा परतावा प्राप्त करू शकता . जर तुम्हाला उतार वयामध्ये पेन्शनची हमी हवी असल्यास , या पॉलिसीच्या माध्यमातून गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित असणार आहे .

एलआयसीच्या या जीवन अक्षय पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक केल्यास , तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळत राहणार आहे यामध्ये मासिक प्रीमियम भरण्याची आवश्यकता असणार नाही . फक्त एकाच वेळेस पॉलिसी रक्कम भरावी लागेल त्यानंतर आयुष्यभरासाठी पेन्शनची हमी मिळेल . यामुळे ही पॉलिसी गुंतवणूकदारांसाठी अधिक फायदेशीर ठरत आहे .

या पॉलिसीची खरेदी आपण ऑनलाइन अथवा एलआयसी एजंट च्या मार्फत खरेदी करू शकता , या पॉलिसीमध्ये वय वर्ष 30 ते 85 वर्ष वयोगटातील नागरिक पॉलिसी खरेदी करू शकतील .जर आपण एलआयसीच्या या जीवन अक्षय पॉलिसी योजनांमध्ये एकरकमी 40 लाख 72 हजार इतकी रकमेची गुंतवणूक केल्यास , आपणास आयुष्यभरासाठी वीस हजार रुपये इतकी मासिक पेन्शन मिळत राहील .

जर आपणास ही पॉलिसी बंद करायची असल्यास , आपली मुद्दल रक्कम परत मिळेल परंतु त्यावर कोणताही अधिकांश लाभ प्राप्त होणार नाही , पॉलिसी मधील रक्कम काढल्यास पेन्शन बंद होईल एक प्रकारची एलआयसीची ही एकल आणि संयुक्त विमा पॉलिसी दहा वर्ष कालावधी करिता उपलब्ध करून देण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *