Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ lic dhanasanchay scheme ] : भारतीय आयुविर्मा महामंडळ मार्फत लाभदायक धनसंचय योजना लाँच करण्यात आलेला आहे , सदर योजनांच्या माध्यमातुन आपणांस अनेक लाभ दिले जातात , या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणुन घेवूयात ..

धनसंचय योजनाचे फायदे : यांमध्ये पॉलिसीधारकांनी निवड केलेल्या पर्यायावर अवलंबून 5 वर्षांच्या कालावधीत मृत्युचा लाभ हा एकर रकमी अथवा हप्त्यांमध्ये अदा केला जातो . तसेच विमा धारक हा मुदतपुर्ती तारेखपर्यंत जिवतं राहीला असेल तर मॅच्युरिटी बेनिफिट गॅरंटीड उत्पन्न बेनिफीट व गॅरंटीड टर्मिनल बेनिफिट म्हणून दिला जाणार आहे .

रायडरला या विमा योजनांमध्ये अपघात लाभ , अपघातील मृत्यु व अपंगत्व लाभ , नविन टर्म ॲश्युरन्स , प्रिमियम माफी लाभ , नविन गंभीर आजार लाभ अशा प्रकारचे फायदे रायडर होत असतात . सदर प्लॅन मध्ये मासिक , त्रैमासिक , अर्धेवार्षिक तसेच वार्षिक स्वरुपात प्रिमियमचा भरणा करु शकता . त्याचबरोबर पॉलिसीवर कर्ज देखिल मिळतो .

पात्रता : सदर पॉलिसी चा लाभ घेण्याकरीता प्रवेशासाठी किमान वय हे 3 वर्षे तर कमाल वय हे 65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .तर परिपक्कतेचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 65 वर्षे .तर पॉलिसीचा टर्म हा 10 व 15 वर्षे इतका असणार आहे .

प्रिमियम : रुपये 30,000/- रुपये किमान वार्षिक हप्ता असेल . यांमध्ये कमाल प्रिमियमचा हप्ता साठी मर्यादा असणार नाही .

विमाधारकाच्या मृत्युवर किमान विमा रक्कम : विमाधारकाचा मृत्यु झाल्यास 3.30 लाख रुपयाचा लाभ मिळेल .

अधिक माहितीसाठी विमा ऐजंट अथवा LIC च्या अधिकृत्त संकेतस्थळाला भेट देवून सदर प्लॅनविषयक अधिक माहिती घेवून लाभ घेवू शकता ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *