Spread the love

Live marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ LIC BIMA SAKHI SCHEME] : LIC बिमा सखी योजना अंतर्गत , वय वर्ष 18 ते 70 गटातील महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने सरकारकडून सुशिक्षित महिलांना रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . सदर योजना बद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे जाणून घेवूयात .

सदर योजना अंतर्गत महिलांना तीन वर्ष प्रशिक्षण दिले जातील , त्यानंतर विम्याचे महत्त्व समाजामध्ये पटवून देणे तसेच आर्थिक बचत कशी करावी , याचे महत्त्व सांगण्याचे काम म्हणजे एक प्रकारे विमा एजंट म्हणून काम करता येणार आहेत . तर याकरिता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असतील , तर पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना डेव्हलपमेंट अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे .

पात्रता / अटी /  शर्ती : सदर योजना करिता महिला या इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असतील , सदर महिलांचे वय हे 18 ते 70 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल , सदर योजनेमध्ये सहभागी झाल्याच्यानंतर तीन वर्ष प्रशिक्षणदेण्यात येइल, सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये पैसे देण्यात येतील .

सदर प्रशिक्षणामध्ये महिलांना विमा पॉलिसी विक्रीचे प्रशिक्षण दिली जाईल . सदर नियुक्ती ही पगारी नियुक्ती मानली जाणार नसून , सदर महिलांना दरमहा स्टायपेंड दिले जाईल . तर महामंडळाचे हे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून कोणतेही अधिकार व लाभ प्राप्त होणार नाहीत .

दरमहा 07 हजार रुपये मानधन मिळेल : सदर योजना अंतर्गत महिलांना दर महिन्याला 7,000/-  रुपये मानधनाची तरतूद आहे , तर ज्या महिला निश्चित करण्यात आलेले टार्गेट पूर्ण करतील , अशांना स्वतंत्र पद्धतीने कमिशन दिले जाईल . या योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये 35,000 महिलांना सहभागी करून घेतले जाणार आहेत . त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पन्नास हजार महिलांना सहभागी करून घेण्यात येणार आहेत .

अर्ज करण्याची पद्धत : सदर योजना अंतर्गत अर्ज करण्याकरिता https://licindia.in/test2 या संकेतस्थळावर क्लिक करून , Bima Sakhi यावर क्लिक करावे , त्यामध्ये आपली सर्व माहिती भरून अर्ज सबमिट करावेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *