Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ LIC Jeevan Anand ] ; भारतीय आयुर्विमा महामंडळ ही विमा कंपनी भारतीतील सर्वात लोकप्रिय व विश्वसनिय असल्याने , एलआयसी मध्ये गुंतवणुक करण्याचा सर्वांतचा कल अधिक आहे . अशाच एका योजना बद्दल आपण या लेखांमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत , ती म्हणजे फक्त 45/- रुपयांच्या गुंतवणुकीवर आपणांस 25 लाख रुपये पर्यंतचा लाभ मिळणार आहे .
या विमा पॉलिसी योजनेचे नाव म्हणजे जीवन आनंद असे आहे , ही एक प्रकारची मुदत विमा योजना असून आपण या योजनांमध्ये दररोज 45/- रुपये प्रमाणे जमा करुन 25 लाख रुपये पर्यंतचा आर्थिक लाभ प्राप्त करु शकतो .. ही एक प्रकारची टर्म प्रिमियम पॉलिसी योजना असल्याने , आपणांस या पॉलिसी योजना अंतर्गत जो पर्यंत पॉलिसी सुरु आहे , तो पर्यंत आपणांस विमा हप्ता भरावा लागतो .
यांमध्ये आपण जर 5 लाख रुपये रक्कमेचा विमा पॉलिसी घेतल्यास आपणास , दररोज 45/- रुपये प्रमाणे दरमहा 1350/- रुपये इतका प्रिमियम भरावा लागेल तर वार्षिक हप्त्याच्या बाबतीत विचार केला असता , 16,200/- रुपये इतका प्रिमियम रक्कम भरावी लागेल . जर आपण या योजना अंतर्गत सतत 35 वर्षे गुंवणुक करत गेल्यास , आपणांस पॉलिसीची मुदत संपल्याच्या नंतर 25 लाख रुपये इतकी रक्कम मिळेल .
यांमध्ये आपणांस आर्थिक लाभाबरोबर मृत्यु लाभ देखिल मिळतो , त्याचबरोबर रायडर लाभ देखिल प्राप्त होतो . जर विमा धारकाचा मृत्यु झाला असेल अशा प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना विमा पॉलिसी रक्कमेच्या 125 टक्के रक्कम प्राप्त होते . शिवाय यांमध्ये आपण जर यांमध्ये नियमित 15 वर्षे गुंतवणुक करत गेल्यास आपणांस दुप्पत बोनस देखिल मिळतो .
यामुळे या पॉलिसी योजनेमध्ये रोज फक्त 45/- रुपयांची गुंतवणुकीमध्ये 35 वर्षानंतर 25/- रुपये इतका फायदा मिळत आहे , शिवाय 15 वर्षाच्या नंतर बोनसची रक्कम देखिल दुप्पट होत आहे . यामुळे ही विमा पॉलिसी अधिक फायदेशिर ठरणारी आहे .