Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ lic amritbaal policy ] : आजच्या धावपळीच्या युगामध्ये मुलांच्या उज्वल भविष्याकरिता योग्य प्रकारचे पैशांची बचत करणे आवश्यक आहे , याकरिता भारतीय आयुर्विमा कंपनीकडून खास करून मुलांच्या भविष्याची गुंतवणुकी करिता अमृतबाल योजना लॉन्च केली गेली आहे .
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे मुलाची किमान 30 दिवस पूर्ण झाल्यानंतर या योजनेअंतर्गत पॉलिसी घेवू शकता , तर मुलाची कमाल 13 तेरा वर्षे होईपर्यंत या पोलिसी अंतर्गत गुंतवणूक करू शकता . तर किमान पॉलिसी टर्म दहा वर्ष तर सिंगल प्रीमियम पेमेंट करिता पाच वर्ष इतका आहे .
तर कमाल विमा मुदत 25 वर्ष इतकी आहे , सदर पॉलिसीची कमाल परिपक्वता ( मॅच्युरिटी ) 25 वर्ष इतकी आहे , तर किमान 18 वर्ष इतकी परिपक्वता ( मॅच्युरिटी ) कालावधी आहे . त्यानंतर आपणास सदर पॉलिसी अंतर्गत व्याज ,बोनस , मुद्दलसह रक्कम दिली जाते .सदर पॉलिसी अंतर्गत किमान विमा रक्कम 02 लाख रुपये इतकी आहे . तर कमाल विमा रकमेस कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही . म्हणजेच आपण कमाल कितीही विमा रक्कम घेऊ शकतो .
मृत्यू लाभ : सदर पॉलिसी अंतर्गत मर्यादित प्रीमियम पेमेंट मध्ये मूळ बीमारक्कम अधिक 7 X वार्षिक प्रीमियम इतका लाभ दिला जातो , तर सिंगल प्रीमियम पेमेंट मध्ये 10 X सिंगल प्रीमियम असा आर्थिक लाभ दिला जातो .
सदर पॉलिसी विकत घेण्याकरिता ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा ऑफलाइन एलआयसी एजंट च्या माध्यमातून विकत घेऊ शकता .