Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ LIC ADHAR SHILA POLICY ] : आपण दरमहा फक्त 1800/- रुपयांचा किमान प्रिमियम सह भरणा करुन मुदतीनंतर तब्बल 8 लाख रुपयांचा परतावा मिळवू शकता . या पॉलिसी अंतर्गत किती वर्षांचा भरणा करावा लागतो , वयोमर्यादा तसेच मिळणारे इतर फायदे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहुयात ..

एलआयसी  आधार शिला विमा योजना : या विमा योजनेचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ही विमा योजना केवळ महिलांच्या नावे काढता येते . या पॉलिसी अंतर्गत किमान 8 वर्षे व कमाल 55 वर्षे असणाऱ्यांना महिलांना या विमा पॉलिसी अंतर्गत विमा काढता येणार आहे . यामध्ये आपण किमान 75,000/- रुपये ते कमाल 3,00,000/- रुपये पर्यंतचा विमा खरेदी करु शकता .

पॉलिसीची खास वैशिष्ट्ये : ही पॉलिसी घेण्यासाठी विमा धारक शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्या बाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहेत , तसेच या पॉलिसीची किमान मुदत ही 10 वर्षांची तर कमाल मुदत ही 20 वर्षे इतकी असते . या पॉलिसी योजना अंतर्गत महिलांना कर्ज सुविधा देखिल मिळते .

8 लाख रुपये पर्यंतचा मिळेल परतावा : आपण या पॉलिसी अंतर्गत दररोज 58 रुपये म्हणजे प्रतिमहा सरासरी 1800/- रुपये प्रिमियम जमा केल्यास , आपणांस एका वर्षांमध्ये 21,600/- रुपये इतका प्रिमियम जमा होईल . आपण जर या पॉलिसी अंतर्गत कमाल 20 वर्षे पर्यंत प्रिमियम भरल्यास आपणांस 20 वर्षानंतर 8,00,000/- रुपये इतका परतावा मिळेल .

या पॉलिसी अंतर्गत आपण मासिक , त्रेमासिक , सहामाही व वार्षिक पद्धतीने प्रिमियम भरु शकता . शिवाय सर्वाधिक परतावा मिळत असल्याने , या पॉलिसी योजनांमध्ये महिलांच्या नावे गुंतवणुक करणे अधिक फायदेशिर असणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *