Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ State Employee Leaves Rules See Detail ] : महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( रजा ) नियम नुसार रजा , विशेष रजा अनुज्ञेय करण्यात येतात , सदर नियमानुसार रजेला जोडून रजा घेणेबाबतचा सविस्तर नियम पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची रजा ही दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या रजेला जोडून घेता येते ( मंजुर करण्यात येते ) . परंतु विशेष नैमित्तिक ( किरकोळ ) रजा ही महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियमा खाली येत नसल्या कारणांने एका पुर्ण दिवसाच्या किरकोळ रजेला जोडून इतर कोणत्याही प्रकारची रजा घेता येत नाही . तर अर्ध्या दिवसांच्या नैमित्तिक ( किरकोळ ) रजेला जोडून मंजूर करता येईल असे रजा नियम 15 मध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
रजा संपल्याच्या नंतर पुन्हा रेजेवर जाण्याकरीता हेतुपुरस्पर नियमांपासून सुटका करुन घेण्याकरीता कामावर हजर होवून पुन्हा रजेवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांस कार्यालय प्रमुखांकडून परवानगी देता येणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . याबाबत कर्मचाऱ्यांची रजेची आवश्यक हेतुपुरस्पर आहे कि नाही हे ठरविण्याचा संपुर्ण अधिकार हे सक्षम प्राधिकाऱ्याला असणार आहेत .
त्याचबरोबर कोणतीही रजा ही सतत 05 वर्षांपेक्षा अधिक कालावधी करीता मंजुर करता येत नाही , रजा कालावधी मध्ये अन्यत्र ठिकाणी व्यवसाय अथवा नोकरी सक्षम प्राधिकाऱ्याच्या पुर्व परवानगी शिवाय स्विकारता येणार नसल्याचे सदर महाराष्ट्र नागरी सेवा ( रजा ) नियम अंतर्गत नमुद करण्यात आलेले आहेत .
किरकोळ रजा ही सार्वजनिक सुट्टीस जोडून घेता येते , पंरतु अर्जित / अन्य प्रकारच्या रजेला जोडून घेता येत नाही . तर एकावेळी 03 दिवसांपेक्षा अधिक दिवस किरकोळ रजा घेता येत नाही . किरकोळ रजा ही कर्तव्य कालावधीमधून दिली जाणारी सुट असल्याने , वेळ प्रसंगी कर्मचाऱ्यांचे अर्ज नसले तरी कार्यालय प्रमुखांच्या परवानगीने किरकोळ रजा मिळू शकते .