Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Latest imp current affiars ] : सध्याच्या काही महत्वपुर्ण चालु घडामोडी या लेखांमध्ये सविस्तर पणे जाणून घेवूयात ..
लाडकी बहीणींसाठी विशेष तरतुद : महायुती सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना करीता सध्या सुरु असलेल्या अधिवेशनांमध्ये तब्बल 1400 कोटी रुपयांची विशेष तरतुद करण्यात आलेली आहे . यावेळी 35 हजार कोटींच्या पुरवणी मागणी करण्यात आलेली होती .
बिटकॉइन : बिटकॉईन मार्केट हे चालु घडामोडी वर आधारीत आहे , एखादी सकारात्मक बाब समोर आल्यास झपाट्याने बिटकॉईनची किंमत वाढते , तर नकारात्मक बाब समोर आल्यास झपाट्याने मार्केट क्रॅश होते , सध्या ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्याने बिटकॉईनने नवा चढता इतिहास रचला आहे .
थंडीत वाढ : राज्यांमध्ये यंदा पावसाचे प्रमाण अधिक होते , यामुळे थंडीचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात आहे . यामुळे रुम हीटरच्या किंमतीमध्ये तब्बल 10 टक्क्यांच्या वाढ झालेली आहे .
- मस्साजोग या सरपंच हत्येची CBI मार्फत चौकशी करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .
- देशांमध्ये तब्बल 21 बनावट विद्यापिठे , यांमध्ये देशाची राजधानी दिल्ली येथे सर्वाधिक 08 विद्यापीठे .