Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ latest current affairs dated 19 December 2024 ] : दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी च्या काही महत्त्वपूर्ण घडामोडी या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊयात ..
राज्याचे हिवाळी अधिवेशन 21 डिसेंबर पर्यंत चालणार : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे दिनांक 16 डिसेंबर पासून सुरू असून , दिनांक 21 डिसेंबर पर्यंत सदरचे कामकाज सुरू राहणार आहेत . यामध्ये राज्यातील विविध प्रश्नावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत .
मुंबई बोट दुर्घटना : मुंबई येथील एलिफंटा परिसरामध्ये प्रवासी बोट पडल्याची घटना घडली असून , बचावात्मक कार्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत . तटरक्षक दल , स्थानिक मच्छिमार , नौदल यांच्या सहाय्याने बचावात्मक कार्य केले जाणार आहेत .
शरद पवार बीडमध्ये : सरपंच संतोष देशमुख मृत्यू प्रकरणी राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप केला जात असून , सदर प्रकरणाची तपास घेण्यासाठी तसेच संतोष देशमुख यांच्या
कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार बीडमध्ये लवकरच जाणार आहेत .
वन नेशन वन इलेक्शनसाठी समितीचे गठन : वन नेशन वन इलेक्शन करिता सरकारकडून 31 सदस्य असणारी समितीचे गठन करण्यात येणार आहेत . सदर समितीच्या अहवालानंतर या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे .
परभणी येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली असून , सविस्तर तपास करून , गुन्हेगारांना अटक करण्याची निर्देश देण्यात आली आहेत .