Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Lakhapati Didi Yojana ] : केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनांच्या माध्यमातुन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सदरची लखपती दीदी योजना सुरु करण्यात आलेली आहे , या योजनांच्या माध्यमातुन महिलांना उद्योगकरीता तब्बल 5 लाख रुपयांचे कर्ज बिनव्याजी मिळते .

या योजनांची घोषणा देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहुर्तावर करण्यात आलेली होती . याकरीता यंदाच्या अंतरित अर्थसंकल्पांमध्ये आर्थिक तरतुद केंद्र सरकारने करण्यात आलेली आहे . यांमध्ये नमुद आहे कि , देशात महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविणे . याकरीता या योजनांतुन 2 कोटी वरुन 3 कोटी महिलांना प्रशिक्षण देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे .

योजनांचे स्वरुप काय आहे ? या योजनांच्या माध्यमातुन ग्रामीण / खेड्यातील महिलांना कौशल्य विकास / प्रशिक्षण विभागांकडून प्रशिक्षण देण्यात येते , कौशल्य विकास प्रशिक्षणानंतर महिलांना एलईडी बल्ब तयार करणे , ड्रोन दुरुस्ती करणे , ड्रोन चालवणे , प्लंबिंग कामकाजाचे प्रशिक्षण , तसेच व्यवसाय प्लान , मार्केटिंग , अशा तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देण्यात येते .

ही योजना प्रत्येक राज्याच्या स्वयं – सहायता गटांमार्फत चालविण्यात येते , या योजनांच्या माध्यमातुन महिलांना बिनव्याजी 5,00,000/- रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते . आत्तापर्यंत य योजनांच्या माध्यमातुन तब्बल 1 कोटी महिलांना या योजना अंतर्गत लाभ प्राप्त झाले आहेत .

कर्ज घेण्याची प्रक्रिया : या योजनांच्या माध्यमातुन कर्ज घ्यायचे असल्यास प्रथम महिलांची विभागीय बचत गटाकडे नोंदणी असणे आवश्यक असेल , जर नोंदणी असल्यास बचत गट कार्यालयात याबाबत , कर्जासाठी आवेदन सादर करु शकता , सदर व्यवसाय योजनांसह आवश्यक असणारी कागदपत्रांची छाननीनंतर महिलांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते . याकरीता महिलांचे वय हे 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असेल , तर महिला बचत गटाचा हिस्सा असणे आवश्यक असेल . अधिक माहितीकरीता https://nrlm.gov.in/  या संकेतस्थळाला भेट देवून द्यावी ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *