Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna stop after election commission order] : महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तूर्तास निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर बंद करण्यात आली आहे .

सदर योजने अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500/-  रुपये देण्यात आले आहेत . आतापर्यंत सदर योजने अंतर्गत 05 महिन्यांचे एकूण 7500/- रुपये पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत . सद्यस्थितीमध्ये सदर योजने अंतर्गत नवीन अर्ज स्वीकारणे , तसेच सदर योजनेला निधी थांबवण्यात आलेला आहे .

सदर योजने अंतर्गत मतदारांना थेट आर्थिक लाभ दिला जातो , सध्या राज्यामध्ये आचारसंहिता सुरू असल्याने , अशा प्रकारच्या थेट आर्थिक लाभाच्या योजना बंद असते , यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर सदर योजनेला निधी राज्य सरकारकडून थांबवण्यात आलेला आहे .

सदरची स्थगिती ही तात्पुरत्या स्वरूपाची असून , निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीची सत्ता स्थापन झाल्यावर , नियमित दरमहा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे येत राहतील असे , विद्यमान सरकारकडून सांगण्यात आले आहे . तर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यास सदरची योजना सुरू राहणार की बंद होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही .

राज्याचे मा.मुख्य निवडणूक अधिकारी मा . एस चौक्कलिंगम  यांनी अशा थेट आर्थिक लाभाच्या योजनास , स्थगिती देण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आली आहे . यामुळे सदर योजना अंतर्गत , महिलांना तूर्तास पुढील हप्ता साठी प्रतीक्षा करावी लागणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *