Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna nidhi vitaran gr ] : लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये , पैसे हस्तांतरित केले जाणार आहेत . या संदर्भात महिला व बालविकास विभागाकडून निधीचे वितरण करणेकरिता दिनांक 05 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक सुधारित शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासनाच्या दिनांक 04 ऑक्टोबर 2024 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक 06 ऑक्टोबर 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा विभागस्तरीय कार्यक्रम घेण्यास मान्यता देण्यात आली असून , त्या अनुषंगाने निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती .

लाडकी बहीण योजना अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे मेळावा आयोजित करण्याच्या अनुषंगाने , सदरच्या कार्यक्रम करिता लागणाऱ्या आवश्यक बाबी करिता खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे . सदर मेळावा विभागस्तरीय असल्याने , छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय मेळावा आयोजित न करण्याचे निर्देश देण्यात आलेली आहे .

त्याचबरोबर सदर योजना अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वितरण करण्याकरिता निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत . यामुळे ज्या महिलांनी सदर योजनेअंतर्गत आवेदन सादर केली आहेत , अशा पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येणार आहेत .

त्याचबरोबर ज्या महिलांच्या काही त्रुटीमुळे आवेदन रद्द करण्यात आली आहेत , अशांना सदर त्रुटी दूर करून पुनश्च अर्ज करण्यास सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . त्याचबरोबर दि.06 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विभागस्तरीय मेळाव्यामध्ये लाडकी बहीण योजना (ladaki bahin yojna) अंतर्गत नवीन घोषणा केले जाणार आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *