Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna new update see detail ] : महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजने अंतर्गत दर महिना 1500/- रुपये देण्यात येत आहे , यामध्ये आता 600/- रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहेत .
सदर योजने अंतर्गत राज्यातील तब्बल दोन कोटी पेक्षा अधिक महिलांना लाभ प्राप्त झालेला आहे .तर तब्बल 35 लाख महिलांचे अर्ज नवीन अटी / नियमानुसार रद्द होणार असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले आहेत .
काही महिलांनी चुकीचे कागदपत्रे सादर करून , सदर योजने अंतर्गत लाभ मिळवला आहे . अशा महिलांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा प्रस्ताव देखील महिला व बाल विकास विभाग कडून तयार करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे . कारण सदर योजनेचे अर्ज भरताना अटी / शर्ती मध्ये काही बाबी प्रामुख्याने नमूद करण्यात आलेली होती . असे असताना देखील अनेक महिलांनी खोटी कागदपत्रे सादर करून अर्ज सादर केली आहेत .
याकरिता राज्य सरकारकडून एक विशेष सर्वसमावेशक पडताळणी मोहीम हाती घेतली जाणार आहे . ज्यामध्ये लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी केली जाणार आहे .
यामध्ये प्रत्यक्ष महिलांच्या घरी जाऊन ही पडताळणी केली जाणार असल्याचे , नमूद करण्यात आले आहे . यामुळे राज्यातील तब्बल 30 ते 35 लाख लाभार्थी कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .