Spread the love

Live marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna bank employee strike] : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील बँक कर्मचारी कंटाळले आहेत , या विरोधात दिनांक 26 नोव्हेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील प्रत्येक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे . यामुळे बँक कर्मचाऱ्यांना काम करत असताना , भीतीचे व असुरक्षितता निर्माण होत आहे . कारण बऱ्याच बँकांमध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नाही . यामुळेच बँक कर्मचारी दिनांक 16 नोव्हेंबर रोजी संपावर उतरले आहेत , याबाबत बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने माहिती देण्यात आली आहे .

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनामुळे बँकांमध्ये महिलांचे पैसे काढण्याकरिता , तसेच पैसे आले की नाही याबाबत तपासणी करण्यासाठी तुफान गर्दी दिसून येत आहे . दरम्यानच्या कालावधीमध्ये काही ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत . यामुळेच बँक कर्मचाऱ्यांना काम करीत असताना , असुरक्षितता जाणवत आहे . सदरचा संप युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन मार्फत आयोजित करण्यात आला आहे .

सदर योजने अंतर्गत लाभार्थ्याकडून त्याचबरोबर स्थानिक पुढारी नेत्यांकडून बँक कर्मचाऱ्यांशी गैरवर्तूक करणे , शिवीगाळ त्याचबरोबर मारहाण अशा घटना घडल्या असल्याने , बँक कर्मचाऱ्यांकडून एक दिवसीय संप आयोजित करण्यात आलेला आहे . यामुळे बँकांना पुरेशी तसेच अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी सदर संपा दरम्यान करण्यात येणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *