Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojana update ] : विद्यमान राज्य सरकारने राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500/- देण्याची योजना सुरु केले आहे . सदर योजना अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात माहे जुलै पासुन ते माहे नोव्हेंबर पर्यंतची रक्कम अदा करण्यात आलेली आहे .

सध्या राज्यात आचार संहिता सुरु असल्याने , आचार संहिता सुरु होण्यापुर्वीच सदर योजना अंतर्गत माहे नोव्हेंबर पर्यंतची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे . आता माहे डिसेंबर महिन्यांच्या पैसे कधी पडणार याबाबत राज्याचे मा.मुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण दिले आहेत .

राज्यात दि.20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे , तर दि.23 नोव्हेंबर रोजी मतदान मोजणी होणार आहे . त्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाल्या झाल्या पुन्हा तात्काळ सदर योजना अंतर्गत डिसेंबर महीन्यापुर्वीच पैसे अदा केले जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे .या शिवाय सदर योजना अंतर्गत वाढीव रक्कम तसेच सणा-सुदीच्या काळात सण भेट रक्कमेची देखिल तरतुद केली जाईल , अशी घोषणा करण्यात आलेली आहे .

तसेच बऱ्याच महिलांचे सदर योजना अंतर्गत अर्ज रद्द झाले आहेत , अशांना नव्याने अर्ज सादर करता येणार आहेत . तर राज्याचे वित्त मंत्री अजित पवार यांनी सांगितले कि , माहे डिसेंबर महिन्यांच्या हप्त्यासाठी निधीची तरतुद अगोदरच करण्यात आलेली असून , सत्ता आली नाही आली तरी देखिल डिसेंबर महिन्याचे पैसे लाडकी बहीणींच्या खात्यात अदा केले जाईल असे स्पष्ट केले आहेत .

जर भविष्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यास सदर निधीतील वाढीसह महिलांना इतर आर्थिक फायदे देखिल दिले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *