लाडकी बहीण योजना अंतर्गत या महिलांना मिळणार नाही लाभ ; अशा महिलांना अर्ज न करण्याचे आव्हान !

Spread the love

Live Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojana scheme ] : लाडकी बहीण योजना अंतर्गत सध्या सेतु सुविधा केंद्रावर रांगच रांग लागली आहे , परंतु या योजना अंतर्गत काही महिलांना लाभ दिला जाणार नाही , असे स्पष्टीकरण राज्य शासनांकडून करण्यात आलेले आहेत , यामुळे अशा महिलांनी सदर योजना अंतर्गत आवेदन सादर करुन नयेत , असे नमुद करण्यात आले आहेत .

ज्या कुटुंबाकडे 5 एकर पेक्षा अधिक जमीन आहे , परंतु ज्यांच्या कौटुंबिक उत्पन्न हे 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहेत , अशा महिलांनीच या योजना अंतर्गत अर्ज सादर करायचे आहेत . त्याचबरोबर ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना , श्रावण बाळ योजना अथवा इतर योजना अंतर्गत 1500/- रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत असेल , अशा महिलांना या योजना अंतर्गत अर्ज सादर करु नयेत , असे राज्य शासनांकडून आव्हान करण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर ज्या कुटुंबामधील सदस्य हा नियमित / कायम कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारच्या कोणत्याही विभाग /मंडळ /संस्था मध्ये कार्यर असल्यास अथवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असल्यास त्यांना सदर योजना अंतर्गत लाभ मिळणार नाही .

ज्यांच्याकडे चारचाकी ( कार , ट्रक , टॅम्पो इ. यांमध्ये ट्रॅक्टर वगळता इतर सर्व चारचाकी वाहन ) कुटुंबामधील कोणत्याही सदस्यांच्या नावे नोंदणीकृत असल्यास , अशांना सदर योजना अंतर्गत लाभ प्राप्त होणार नाही , असे नमुद करण्यात आलेले आहेत . तसेच ज्यांच्या कुटुंबामधील सदस्य हा भारत सरकार / राज्य सरकारच्या मंडळ / बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष /सदस्य / संचालक आहेत , अशा कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही .

अर्ज सादर करण्यासाठी विशेष मोहीम : ऑनलाईन माध्यमातुन अर्ज सादर करण्यासाठी राज्य शासनांकडून दिनांक 08 जुलै 2024 पासुन प्रत्येक गावांमध्ये शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत , ज्यांमध्ये महिलांच्या नावे आवेदन सादर करता येणार आहेत .

Leave a Comment