Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Ladaki Bahin yojana new update ] : राज्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केल्याने , विधानसभा निवडणूकीत महायुती पक्षांना मोठा फायदा झाल्याचे दिसून आले आहे . या योजना बाबत काही महत्वपुर्ण अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
सत्तेत आल्यास महायुती सरकारकडून लाडकी बहीणींना दरमहा 2100/- देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहेत . सदरच्या आश्वासनानुसार , आता लाडकी बहीनींना दरमहा 1500/- रुपये ऐवजी 2100/- रुपये खात्यात मिळणार आहेत .
2100/- दरमहा कधीपासुन मिळणार ? : पात्र लाडकी बहीनींना दरमहा 2100/- रुपये कधीपासून मिळणार हा प्रश्न सर्वांना पडत असेल ? तर सदर आश्वासनांची पुर्तता ही अर्थसंकल्पानंतरच होवू शकते . यामुळे पात्र महिलांना सदर योजना अंतर्गत माहे एप्रिल महिन्यांपासून ( अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ) मिळेल .
या महिला होणार अपात्र : श्रावणबाळ वयोवृद्ध पेन्शन / इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असणाऱ्या महिला आता सदर लाडकी बहीण योजनांमधून वगळण्यात येणार आहेत . अशा महिलांचे नावे हे ऑनलाईन पोर्टलवर दुसऱ्या योजनांचा लाभ घेत असल्याचे दिसणार आहेत .
डिसेंबर महिन्यात पुढील हप्ता : आता निवडणुका संपन्न झाल्या आहेत , तर माहे डिसेंबर महिन्यात लाडक्या बहीणींना पुढील हप्ता दिला जाणार आहे .