Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojana big update ] : लाडकी बहीण योजना संदर्भात आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . सदरच्या माहितीनुसार , लाडक्या बहीणींसाठी महत्वाचे निर्देश देण्यात आले असून , अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला आहे .
काय आहे प्रकरण : सध्य स्थितीत लाडकी बहीण योजना अंतर्गत कोणत्याही प्रकारचे नव्याने अर्ज स्विकारले जात नाही . परंतु असे असताना देखिल अनेक जन अर्ज केले जाईल अशा प्रकारचे अफवा पसवत आहेत . यामुळे अशा अफवांना पळी पडू नका असे आव्हान करण्यात आले आहेत .
ज्यांना अद्याप एकही हप्ता मिळाला नाही , अशांना एकत्रित मिळणार सर्व हप्त्यांचे पैसे : ज्या महिलांना सदर योजनांचे निकष पुर्ण करत असूनही ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे एकही हप्ते मिळाले नाहीत , अशांना एकत्रित सर्व हप्त्यांचे पैसे एकत्रित दिले जाणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहेत .
नविन अर्ज बंद : सदर योजनांच्या माध्यमातुन नव्याने अर्ज करु इच्छिणाऱ्या महिलांना आता नविन अर्ज करता येणार नाहीत . कारण सरकारकडून नविन अर्ज करणे बंद करण्यात आलेले आहेत .
निकष पुर्ण असेल तरच मिळणार लाभ : सदर योजना अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी नमुद करण्यात आलेले निकष पुर्ण करणारे लाभार्थी महिलांची पुन्हा छाननी केली जाणार असून , ज्या महिला खरोखरच निकष पुर्ण करीत असतील अशांनाच सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ दिले जाणार आहेत .