पात्र लाडकी बहीनींसाठी खुशखबर ; या तारखेला येणार खात्यात 1500/- रुपये , सरकारकडुन ठरला मुहुर्त !

Spread the love

Live marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojana news ] : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत मासिक पहीला हप्ता वितरीत करण्यास राज्य शासनांकडून मुहुर्त ठरविण्यात आला आहे , सदर योजना अंतर्गत पात्र लाडकी बहीनींच्या खात्यांमध्ये 1500/- रुपये पाठविले जाणार आहेत .

या योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500/- रुपये म्हणजेच वर्षाला 18000/- रुपये इतकी रक्कम पात्र होणार आहे . याकरीता अद्याप ज्या महिलांचे अर्ज करणे बाकी आहेत , अशा बहिनींने अर्ज करण्यांच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत . अर्ज सादर करण्याची मुदत ही दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत देण्यात आलेली आहे  . याकरीता महिलांकडून अर्ज सादर करण्यास मोठी धावपळ सुरु आहे .

सदर योजना अंतर्गत पहिला हप्ता या दिवशी मिळणार : माहे जुलै महिन्यांपासुन पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत . सदर योजनेचे नाव लाडकी बहीण योजना असल्याने , रक्षा बंधनच्या शुभ मुहुर्तावर देण्याचे मुहुर्त ठरविण्यात आले आहेत , राज्य शासनांकडुन मिळालेल्या माहितीनुसार रक्षा बंधनच्या दिवशी लाडकी बहीनींच्या खात्यात पैसे हस्तांतरीत व्हावेत , या हेतुने दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजीच ( रक्षा बंधनच्या अगोदरच्या दिवशीच ) माहे जुलै व ऑगस्ट महिन्यांचे एकत्रित 3 हजार रुपये दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .

हे पण वाचा : मुंबई उच्च न्यायालयांमध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

सध्या राज्य शासनांकडुन सदर योजना अंतर्गत प्राप्त अर्जाची छाननी केली जात असुन , अपात्र अर्जास पुन्हा त्रुटींची पुर्तता करुन दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यास मुफा देण्यात येत आहेत .

यामुळे सदर योजना अंतर्गत पहिला हप्त्यांमध्ये जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा एकत्रित 3000/- रुपयांची रक्कम लाडकी बहीनींच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत , याकरीता आवश्यक निधी वितरीत करण्यास राज्य शासनांकडून मंजूरी देण्यात आलेली आहे .

Leave a Comment